Thursday, 6 March 2025

अध्याय दुसरा : 72 सांख्ययोग: गीतेचे सार.

 

मनात असंख्य प्रश्नाचं काहूर, आपल्या हातून पातक घडेल याची भीती. कृष्ण म्हणतात “ भलत्या वेळी तुला हे भलतं काय सुचते? ह्याने दुष्कीर्ति आणि दुर्गती होईल. अश्या गोंधळलेल्या मनस्थतीत अर्जुनाचा कृष्णावर दृढ विश्वास आहे. तो म्हणतो “ सर्वात श्रेयस्कर, चांगल काय आहे ते सांग. शिष्य म्हणून शरण आलो आहे.  श्रीकृष्ण म्हणाले तू भलताच शोक करीत वृथा  ज्ञानाची जोड देत आहेस. आता ऐक जीवनाचे मुलभूत सिद्धांत.

सांख्य -बुध्दी  याचा अर्थ जीवनाचे मुलभूत सिद्धांत दुस-या अध्यायात तीन महासिध्दांत मांडले आहेत. १ आत्म्याची अमरता ;आणि अखंडता: आत्मा अमर आहे. आत्म्याला जन्म नाही आणि मृत्यू हि नाही. वस्त्र जीर्ण झाल्यानंतर आपण बदलतो तसे शरीर जीर्ण झाल्यानंतर आत्मा देह बदलतो. त्याचे शास्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत. अग्नी, पाणी, वारा ,पंच महाभुतांचा त्याचावर काहीही परिणाम होत नाही. आत्म्याचे अकर्तुत्व ,अकर्मत्व, अप्रेरक्त्व , कर्ता, कर्म, आणि प्रेरक तीन प्रकारांनी क्रियेशी संबंध येतो.  

नश्वर देहाचे स्वधर्माचे अवश्य आचरणीयत्व.

 



२ देहाची क्षुद्रता : जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. जो मृत झाला त्याचा जन्म निश्चित आहे. शरीराला बाल्यावस्था , तारुण्य, वाधर्क्य लाभते तसेच मृत्युनंतर आत्म्याला नवा देह प्राप्त होतो. भौतिक शरीर चिरकाल टिकत नाही. जीवात्मा कधीच बदलत नाही.


३ स्वधर्माची अबाध्यता. (टाळता न येणारे).  स्वधर्माचा सिद्धांत कर्तव्य-रूप आहे आणि बाकीचे दोन ज्ञातव्य आहेत म्हणजेच अनुभवाने ज्ञानाने जाणून घ्यायचे आहेत. ज्या आईबापाच्या पोटी मी जन्म घेतला त्यांची सेवा करण्याचा धर्म मला जन्मत:च मिळाला आहे. ज्या  समाजात जन्मलो त्या समाजाची सेवा करण्याचा धर्म ओघानेच प्राप्त झाला आहे. आपल्या जन्माबरोबरच स्वधर्म जन्मतो.  धर्मासाठी युध्द करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. सुख अथवा दु:ख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता कर्तव्य म्हणून युद्ध कर. तुझे नियत कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे परंतु कर्मफलावर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहे असे समजू नकोस तसेच कर्तव्य टाळण्याकडे आसक्त होऊ नकोस                           

या अध्यायात सांख्यबुद्धी, योगबुध्दी आणि स्थितप्रज्ञ लक्षणे सांगीतली आहेत.

No comments:

Post a Comment