तिस-या अध्यायाची सुरवात अर्जुनाच्या प्रश्नांनी झाली आहे. बुद्धी ही सकाम कर्माहून श्रेष्ठ आहे तर युध्द, कर्म करायला का सांगतो आहे? माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे?
भगवंत म्हणतात आत्मसाक्षात्कारासाठी दोन मार्ग
१) तत्त्वज्ञानाने म्हणजे ज्ञानयोग २) भक्तिपूर्वक सेवेद्वारे म्हणजे
कर्मयोग.
कर्म न करण्याने मनुष्याची कर्मबंधनातून मुक्तता होऊ शकत
नाही. मनाद्वारे इंद्रीयसंयम करून कर्म करणे उत्तम.
कर्म न करण्यापेक्षा नेमून दिलेले कर्म करणे श्रेष्ठ.
उदरनिर्वाह करण्यासाठी कर्म आवश्यक आहे.
नियत कर्म करताना यज्ञार्थ म्हणजेच लोककल्याणकारी कर्म कर. सर्व
प्राणीमात्र अन्न धान्यावर जगतात जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून
उत्पन्न होतो. यज्ञ म्हणजे विहित कर्म.
थोडक्यात शरीर श्रमातून सृष्टीच्या साह्याने अन्न
निर्मिती त्यातील सृष्टीच्या देणगीची परतफेड करून,समाजाचं देणं देऊन उरलेलं स्वत:
सेवन करणे म्हणजे प्रसाद.
इंद्रीयतृप्ती साठी कर्म करीत असू तर ते जीवन व्यर्थ
आहे. आत्मसाक्षात्कारी, संतुष्ट होऊन आत्म्यात राहतो. कर्मफलावर आसक्ति न
ठेवता मनुष्याने कर्तव्य कर्म केले
पाहिजे. कर्तव्य कर्म म्हणजे सामाजिक ओघाने अथवा शास्त्रदृष्ट्या वाट्यास आलेले,
सहज नैतिक प्रेरणेने लाभलेले, स्वधर्मरूप कर्म. स्वत:चे नियत कर्म करणे अधिक
श्रेयस्कर आहे. दुस-याचे कर्म किंवा अनुसरण करणे भीतीदायक आहे.
माणसाकडून कर्म करून घेणा-या दोन प्रेरक शक्ती १)
कर्तव्यभावना: अमुक एक मला करायचं आहे. २) प्राप्तव्य भावना: अमुक एक मला मिळवायचं
आहे.
इच्छा नसून पाप का घडते हा एक मानवी मनाचा मुलभूत प्रश्न
आहे. परिस्थिती, संगती,पूर्वजन्म,संस्कार इत्यादी कारणे काढली तरी ती त्यांची समर्पक
उत्तर देण्यात असमर्थ आहेत. इच्छा नसून पाप घडते हा एक भ्रम आहे. स्थूल इच्छा नसली
तरी सूक्ष्म रूपाने ती असते. ती ओळखावयास हवी.
रजोगुणामुळे हि इच्छा निर्माण होते त्याचेच क्रोधात रूपांतर होते. अर्जुना
इंद्रियांचे नियमन करून या पापाचा प्रारंभीच निग्रह कर. आपण भौतिक इंद्रिये, मन,
बुद्धी यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहोत. विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला
स्थिर केलं पाहिजे. कामरुपी अतृप्त शक्तीवर विजय मिळवला पाहिजे. अर्जुन , ज्ञानाने
युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छां न ठेवता, स्वामित्वाचा
दावा न करता आलस्यरहित होऊन युद्ध कर.?
कामना रहित
म्हणजेच कोणतीही इच्छा न ठेवता, स्वत:चे नियत कर्म करणे म्हणजेच निष्काम
कर्म.
No comments:
Post a Comment