अद्वेष्टा सर्वभूतानां
मैत्रः करुण एव च । निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १२-१३ ॥
सन्तुष्टः सततं योगी
यतात्मा दृढनिश्चयः । मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १२-१४ ॥
जो कोणत्याही भूताचा
द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर
प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला,
दुःखात व सुखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध
करणाऱ्यालाही (त्याच्या पश्चातापानंतर) अभय देणारा असतो; तसेच
जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची
माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण
केलेला माझा भक्त मला प्रिय आहे.
यस्मान्नोद्विजते
लोको लोकान्नोद्विजते च यः । हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १२-१५
॥
ज्याच्यापासून
कोणत्याही जीवाला उद्वेग होत नाही तसेच ज्याला कोणत्याही जीवाचा उद्वेग होत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि
उद्वेग इत्यादींपासून मुक्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे.
अनपेक्षः शुचिर्दक्ष
उदासीनो गतव्यथः । सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १२-१६ ॥
ज्याला कशाची अपेक्षा
नाही,
जो अंतर्बाह्य शुद्ध, चतुर, तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न
बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे.
यो न हृष्यति न
द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति । शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १२-१७
॥
जो कधी हर्षयुक्त होत
नाही,
द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्मांचा
त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे.
समः शत्रौ च मित्रे च
तथा मानापमानयोः । शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १२-१८ ॥
जो शत्रू-मित्र आणि
मान-अपमान यांविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी-ऊन, सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांत ज्याची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी
सन्तुष्टो येन केनचित् । अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १२-१९ ॥
ज्याला निंदा-स्तुती
सारखीच वाटते, जो ईशस्वरूपाचे मनन करणारा असतो, जो जे काही मिळेल त्यानेच शरीरनिर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो,
निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो.
No comments:
Post a Comment