Tuesday, 4 March 2025

गीताई माउली माझी, तिचा बाळ मी नेणता!

 

जीवनात पदोपदी मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजे भगवद गीता. थोर मंडळीच्या दृष्टीतून गीता.

आचार्य विनोबा भावे:

गीताई माउली माझी तिचा बाळ मी नेणता

पडतां रडतां घेई उचलूनि कडेवरी

 लोकमान्य टिळक :

भगवद गीता “निष्काम कर्मयोग” सांगते. भगवद्गीता परिणामाशी आसक्ति न ठेवता कर्तव्ये पार पाडण्याचा उपदेश करते.

योगी अरविंद :

“The Gita is not a weapon for dia­lectical warfare; it is a gate opening on the whole world of spiritual truth and experience and the view it gives us embraces all the provinces of that supreme region. It maps out, but it does not cut up or build walls or hedges to confine our vision.”

 गीता हे द्वंद्वात्मक युद्धाचे शस्त्र नाही; संपूर्ण जगासाठी आध्यात्मिक सत्य आणि अनुभूतिचे  द्वार आहे.  आपल्या भोवती कुंपण घालत नाही किंवा भिंती बांधत नाही. सर्व सृष्टीला आपल्यात सामावून घेते. “

 Albert Einstein,Theoretical Physicist


He said: "When doubts haunt me, when disappointments stare me in the face, and I see not one ray of hope on the horizon, I turn to Bhagavad-gita and find a verse to comfort me; and I immediately begin to smile in the midst of overwhelming sorrow.

भगवद्गीतेबद्दल शास्त्रज्ञ काय म्हणतात?

" जेव्हा मी भगवद-गीता वाचतो आणि देवाने हे विश्व कसे निर्माण केले याचे चिंतन करतो, तेव्हा बाकी सर्व काही इतके अनावश्यक वाटते ." “गीता हे मानवजातीला मूल्य देणार्‍या आध्यात्मिक उत्क्रांतिचे सर्वात पद्धतशीर विधान आहे.

गीता, भगवंत कृरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगतात, तीच गीता संजय, धृतराष्टाला सांगतात. कृष्णाच्या बोलण्यात आणि संजयच्या सांगण्यात तीळमात्र फरक नाही असे मानले तरी, आपण कशाबद्दल बोलतो याची कृष्णाला पूर्ण जाणीव आहे तर संजयला मात्र ती नाही. या प्रक्रियेत कृष्ण उदगाता आहे तर संजय वाहक.  अर्जुन, संजय आणि धृतराष्ट गीता ऐकतात, परंतु तिघांच्या ऐकण्यात फरक आहे. संजय, कृष्णाने उच्चारलेले शब्द  ऐकतो ते जसेच्या तसे पुढे नेतो. अर्जुन साधकाच्या वृत्तीने कृष्णाच्या शब्दांमागचा अर्थ जाणून घेऊन आपल्याला प्रश्नांची उत्तरं त्यातून मिळवण्याचा प्रयत्न करतो. कृष्ण काय सांगतो या विषयी धृतराष्टाला स्वारस्य नाही. आज अर्जुना सारखी कोणतीही समस्या आपल्यापुढे नाही परंतु श्रीकृष्णानी सांगितलेले वैदिक ज्ञान जीवनातील कोणत्याही संदर्भात मार्गदर्शक ठरते ते फक्त अर्जुनापर्यंत मर्यादित नाही तर आपल्याला पथदर्शक आहे. अर्जुनाच्या वृतीने गीता अभ्यासू या.

गीता : अठरा अध्याय ,

        : सातशे श्लोक , ५७४ श्लोक श्रीकृष्ण , ८४ श्लोक अर्जुन, ४१ श्लोक संजय , १ श्लोक धृतराष्ट.

                                                                           गीताई माउली

No comments:

Post a Comment