Tuesday, 11 March 2025

अध्याय तिसरा. कर्मयोगः निवडक श्लोक.

 

 



श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ । ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम्‌ ॥ ३-३ ॥

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, पूर्वीच सांगितल्या प्रमाणे निष्ठा म्हणजेच अंतिम स्थिती दोन प्रकारे साधता येते. संख्यायोगी  ज्ञानयोगाने  साधतात तर योगी किंवा भक्तियोगी  कर्मयोगाने साधतात.

 कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्‌ । इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ३-६ ॥

जो कर्मइंद्रिये बळेच संयमित करतो परंतु मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो, तो मूर्ख ,मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो.

यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः । आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥ ३-१७ ॥

 जो मनुष्य आत्म्यामध्ये रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे. आणि जो पूर्णपणे संतुष्ट  होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे.  त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही.

नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन । न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ ३-१८ ॥

आत्मसाक्षात्कारी मनुष्याला या विश्वात कर्मे करण्याचे काही प्रयोजन असत नाही. तसेच कर्मे न करण्याचेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणिमात्रातही त्याचा जरादेखील स्वार्थाचा संबंध असत नाही.

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ ३-२१ ॥

श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो, त्याचे अनुसरण सामान्यजन  करतात; तो जे आदर्श घालून देतो त्यानुसार सारे जग कार्य करते. 

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्‌ । जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्‌ ॥ ३-२६ ॥

अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्मांविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. शास्त्रविहित सर्व कर्मे  आचरून त्यांना कर्माची गोडी लावावी. 

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्‌ । स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३-३५ ॥

आपला धर्म उणा असला तरी परधर्मा हून बरा आहे. आपल्या धर्मात मारणेही कल्याणकारी दुस-याचा धर्म भयाकारी. (धर्म चा अर्थ -विहित, प्राप्त कर्तव्य)

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः । मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ ३-४२ ॥

स्थूलशरीराहून  इंद्रिये पर म्हणजे श्रेष्ठ,  या इंद्रियांहून मन पर आहे. मनाहून बुद्धी पर आहे. आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे, तो आत्मा होय.

एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना । जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्‌ ॥ ३-४३ ॥

अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे, हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून, हे महाबाहो, तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक.

No comments:

Post a Comment