उद्धरेदात्मनात्मानं
नात्मानमवसादयेत् । आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ६-५ ॥
स्वतःच स्वतःचा
संसारसमुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण हा
मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे.
बन्धुरात्मात्मनस्तस्य
येनात्मैवात्मना जितः । अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ॥ ६-६ ॥
ज्या जीवात्म्याने मन व
इंद्रियांसह शरीर जिंकले, त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच
मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले नाही, त्याचे
तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो.
युक्ताहारविहारस्य
युक्तचेष्टस्य कर्मसु । युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ ६-१७ ॥
आहार,निद्रा,विहार आणि कर्म करण्याच्या सवयीत नियमित असतो
तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दु:खाचा परिहार करतो.
यतो यतो निश्चरति
मनश्चञ्चलमस्थिरम् । ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ ६-२६ ॥
हे स्थिर न राहणारे
चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भरकटत असते, त्या त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे.
सर्वभूतस्थमात्मानं
सर्वभूतानि चात्मनि । ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥ ६-२९ ॥
ज्याचा आत्मा
सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्यस्थितिरूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने
पाहणारा आहे, असा योगी आत्मा सर्व सजीवमात्रात स्थित व
सजीवमात्र आत्म्यात कल्पिलेले पाहातो.
असंयतात्मना योगो
दुष्प्राप इति मे मतिः । वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ ६-३६ ॥
ज्याने मनावर ताबा
मिळविला नाही अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे
अशा प्रयत्नशील पुरुषाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे, असे माझे मत आहे.
No comments:
Post a Comment