अर्जुन
म्हणाला, परम गुह्य असं अध्यात्मिक उपदेश
केल्यामुळे माझा मोह नष्ट झाला आहे.
जीवांचे उत्पती, नाश तुझ्या कडून ऐकले. तुझा अभंग महिमा अनुभवला.
पुरुषोत्तमा , तू ईश्वरी रूप, जे सांगीतलं ते मला पटले. तुझे विभूतीने भरलेले
व्यापक रूप मी प्रत्यक्ष पाहू इच्छितो. ते
रूप पाहण्याची योग्यता माझ्यात आहे, असे तू मानत असशील तर दाखव.
भगवान
म्हणाले , अलौकिक आणि विविध वर्णांनी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. वसू, वायू, रुद्र, आदित्य, अश्विनीच्या विविध रुपांना पहा. मनात
उठणारा प्रत्येक कल्पना-तरंग, इच्छा-दर्शन घे. परंतु या नेत्रांनी मला पाहू शकणार
नाही मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो.
संजय
म्हणाले, हे राजा, अश्या प्रकारे बोलून महा योगेश्वर
पुरुषोत्तम भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखविले.
असंख्य
नेत्र, असंख्य मुखे खूप अद्भुत दृष्ये पहिली. दिव्य वस्रे,
आभूषणे , असंख्य आयुधे. सहस्र सूर्याची प्रभा एकवटली तरच भगवंतांच्या
तेजाची बरोबरी करू शकले असते. भगवंताच्या देहात ब्रह्मांडातील विस्तृत रूपे
पहिली. विश्वरूप दर्शनाने आश्चर्य चकित अर्जुन भगवंतापुढे नतमस्तक झाला. हात जोडून
प्रार्थना करता झाला.
अर्जुन
म्हणाला, हे भगवान! मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि विविध
जीवांना पाहतो. कमलासनावर
बसलेल्या ब्रह्मदेवाला तसेच भगवान शंकर सर्व ऋषि आणि अलौकिक सर्पांना तुमच्या
देहात पाहतो. दिव्य दृष्टी दिली असली तरी
तुझे तेज:पुंज रूप पाहणे कठीण आहे. तुम्ही आदी, मध्य
आणि अंत रहित आहात. तुम्ही एकट्याने संपूर्ण आकाश,
ग्रहलोक आणि सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन
तुमच्या मध्ये प्रवेश करीत आहेत. महर्षिगण,
स्वस्ती म्हणत तुमची स्तुति करत आहेत. रुद्रगण,
आदित्यगण, वसुगण, गंधर्व, यक्ष, असुर विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. कौरव,
मुख्य योध्ये तुमच्या भयंकर मुखात प्रेवेश करीत आहेत. ज्या प्रमाणे पतंग आपल्या
विनाशाकरिता अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात त्याप्रमाणे सर्व लोक द्रुतगतीने
तुमच्या मुखात प्रवेश करीत असल्याचे पाहात आहे. तुम्ही सर्व बाजून सर्व लोकांना
गिळंकृत करीत असल्याचं पाहात आहे. मी तुम्हाला प्रणाम करतो उग्ररुपधारी तुम्ही कोण
आहात? ते सांगा.
भगवान म्हणाले, जगताचा नाश करणारा काळ मी आहे.
पांडवाव्यतिरिक्त दोन्ही सैन्यांतील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे. म्हणून ऊठ,
युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर. द्रोण,
भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारले आहे.
तू त्यांचा वध कर.
संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन भगवंतांकडून हे वचन
ऐकून अर्जुनाने हात जोडून नमस्कार केला आणि कृष्णाला म्हणाला, सज्जन ईश्वराला वंदन
करीत आहेत, तर दुर्जन पराजित होऊन पळ काढीत आहेत, चांगलंच
आहे.
हे प्रभो, तू वंदनीय कर्ता आणि गुरु आहेस. तू अग्नि, वायू
, जल, चंद्र तुम्ही आहात. प्रपितामह तुम्हीच आहात पुन: पुन्हा
नमस्कार करतो. तुम्ही सर्वव्यापी आहात सर्व बाजूंनी नमस्कार असो. मी तुम्हाला
तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून, अनादराने संबोधिले, चेष्टा केली, चुकून जे काही केलं
असेल त्यासाठी क्षमा करा. तुम्ही चराचर सृष्टीचे पिता आहात. गुरु देवता आहात.
तुमच्या तोडीचा कोणी नाही. त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोणी नाही.
मी सांष्टांग प्रणिपात करून कृपायाचना करीत आहे. विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित
झालो आहे. तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. तुमचे चतुर्भुज रूप मी पाहू इच्छितो.
भगवान म्हणाले , हे अर्जुन! तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या
अंतरंग शक्ती द्वारे तुला परमश्रेष्ठ विश्वरूप दाखविले. तुझ्या पूर्वी हे विश्वरूप
कोणीही पहिले नव्हते. कारण ते वेदाभ्यासाने , यज्ञाने , दानाने,
पुण्यकर्माने पाहणे शक्य नाही. आता हे रूप मी समाप्त करतो आणि तुला जे रूप
पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांतचित्ताने पहा.
संजय धृतराष्ट्राला म्हणाला,
भगवान श्रीकृष्णानी या प्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी
द्विभुज रूप प्रकट केले.
अर्जुन म्हणाला, हे
भगवान , हे अतीव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे.
भगवान म्हणाले , तुझ्या दिव्य चक्षुद्वारे तू जे रूप
पाहात आहेस या मूळ स्वरुपात मला कोणीही पाहू शकत नाही. अनन्य भक्तीने हे
ज्ञान-दर्शन लाभते. दर्शनामुळे माझ्या तत्त्वात प्रवेश होतो.
हे अर्जुना! माझ्या विशुध्द भक्तीमध्ये संलग्न होऊन,
माझ्याप्रित्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व
प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो तो निश्चितपणे मला प्राप्त होतो.
No comments:
Post a Comment