ब्रह्म
म्हणजे काय? : अविनाशी
दिव्य जीवाला ब्रह्म म्हटलं जाते. ब्रह्म अक्षर ते थोर.
अध्यात्म
म्हणजे काय? : निजभाव
, नित्य भाव ब्रह्मचा सगुण भाव.
कर्म
म्हणजे काय? : जीवाच्या
प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणा-या कार्याला कर्म किंवा सकाम कर्म
म्हणतात.
अधिभूत
म्हणजे काय? : निरंतर
परिवर्तनशील असणा-या भौतिक प्रकृतीला अधिभूत असं म्हटलं जाते.
अधिदैव
म्हणजे काय?: चंद्र-सूर्य
सारख्या देवदेवतांचा समावेश असणा-या परमेश्वराच्या विराट रुपाला आधिदैव
म्हणतात. आधिदैव म्हणजे जीवत्व,
सांभाळण्याची ताकत.
अधीयज्ञ
म्हणजे काय? : प्रत्येक
देहधारी जिवामध्ये परमात्मा रूपाने पुरुषोत्तम वास करतो त्यालाच अधियज्ञ म्हटलं
जाते. अंतर्यामी परमेश्वर.
निग्रही
योगी प्रयाणकाळी तुज जाणतात, ते कसे? अंतकाळी
देवाचे स्मरण कसे ठेवावे.
ईश्वर
स्मरण ठेवणे- मज आठव
ईश्वराला
मन आणि बुद्धी अर्पण करणे.
सातत्ययोग
अभ्यास
आणि वैराग्य – अन्य न लक्ष्युनी ध्यान
अंतर्यामी-परमेश्वर, अधिष्ठान-आत्मतत्व ,प्रतिक -सुर्यमुर्ती
दोन्ही
भुवयामध्ये प्राणवायुला स्थिर करून योगसामर्थ्याद्वारे अविचलीत मनाने भक्तिभावाने
भगवंत स्मरण करणे.
इद्रीय
संयम , मन संयम , प्राण संयम धारणा योगधारणा.
ॐ काराचे उच्चारण.
मुखे ॐ ब्रह्म उच्चारी अंतरी मज आठवी .
अंतकाळी
केवळ माझे स्मरण करीत जो देहत्याग करतो तो तत्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो.
मृत्युसमयी ज्या भावाचे स्मरण करतो त्या भावाची तो नि:संदेह प्राप्ती करतो.
अर्जुना! तू सदैव माझे स्मरण केले पाहिजे आणि (युद्धरूपी) स्वधर्माचे आचरण केले पाहिजे. तुझी कर्मे
देवाला अर्पण केल्याने आणि मनाला,बुद्धीला स्थिर केल्याने देवाची प्राप्ती होईल.
हे
पार्था! मन विचलित होऊ न देता, माझे निरंतर स्मरण करून,
परम पुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणु पेक्षा सूक्ष्म अश्या परम पुरुषाचे अचिंत्य आणि नित्य पुरुष
म्हणून ध्यान करायचे, परम पुरुष सूर्यापेक्षा तेजस्वी आणि दिव्य आहेत. जो मनुष्य
अंतकाळी दोन्ही भुंवयांमध्ये प्राणवायुला स्थिर करतो योगसामर्थ्याद्वारे अविचलीत
मानाने भक्तिभावाने भगवान स्मरण करतो त्याला निश्चितच भगवंताची प्राप्ती
होते.
ॐ काराचे उच्चारण करीत जे संन्यासाश्रामी, ब्रह्मचर्य
व्रत धारण करून ब्रह्मा मध्ये प्रवेश
करण्याची इच्छा धरतात. ज्या योगे मुक्ती मिळेल. असा विधी थोडक्यात
सांगतो. सर्व इंद्रियाचे नियमन करायचे. मन फुटू द्यायचे नाही, इंद्रिय संयम, मन संयम, प्राण संयम करून योग धारणा करतात.
योगाभ्यासात स्थिर झाल्यावर, मुखे
ॐ काराचे उच्चारण अंतरी भगवंताचे
स्मरण करीत देह ठेवला तर आध्यात्मिक गतीस प्राप्त होतो.
पार्था! अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण
करतो. त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो तो निरंतर भक्तियोगात रममाण असतो. सर्व
लोकांना दु:ख आहे. वारंवार जन्म मृत्यू
होतात. परंतु अर्जुना, परमधाम प्राप्त करतो त्याला पुनर्जन्म नसतो.
मानवीय गणनेनुसार एक सहस्र चतुर्युगे म्हणजे
ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि सहस्र चतुर्युगाची रात्र. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ
झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि रात्र प्रारंभ होते तेव्हा
अव्यक्तात लय पावतात. याहून ही अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे. ती परा आणि अविनाशी
आहे. अव्यक्ताच्या पलीकडे जी वस्तू आहे, तिला अक्षर म्हटलं आहे. जे परमलक्ष्य म्हणून जाणले
जाते. तेच माझे परमधाम होय. अनन्य भक्तीने पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती होते. तो
सर्व व्यापी आहे आणि सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे. हे भरतश्रेष्ठा!
वेगवेगळ्या काळी योग्याने या जगातून प्रयाण केले असता, तो
परतून येतो अथवा येत नाही याचे मी तुला वर्णन करतो.
अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये,
शुभक्षणी, शुक्लपक्षामध्ये अथवा सूर्य उत्तरायणात असतो (२२
डिसेंबर ते २२ जून ) त्या सहा महिन्यात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती
होते. धूर, रात्र, कृष्णपक्ष किंवा दक्षिणायन मध्ये मृत्यू तो चान्द्रलोकाची
प्राप्ती करतो तो पुन्हा परत येतो.
वैदिक मतानुसार या जगतातून प्रयाण करण्याचे प्रकाशमय आणि अंधकारमय असे दोन मार्ग आहेत.
प्रकाशमय मार्गातून प्रयाण करणारा मनुष्य पुन्हा येत नाही. परंतु अंधकारमय
मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो. हे अर्जुना! भक्त जरी हे दोन्ही मार्ग
जाणत असले तरी ते कधीच मोहित होत नाहीत. म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो. केवळ
भक्तिपूर्ण सेवा केल्याने यज्ञ, दान, तप, अध्ययन, याने जे पुण्य प्राप्त होते त्याही पलीकडचे पुण्य योगी,भक्त
प्राप्त करतो.
No comments:
Post a Comment