Saturday 24 September 2016

मन धीर धर रे, तू !


 


 दैनंदिन जीवनात कश्याला हवं साहस, धैर्य.   आपल्याला काय लढाई करायची आहे. शांततेत, आनंदात, आरामात जगायचं. 

तुकाराम महाराज म्हणतात 

 रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर बाह्य जग आणि मन।

 बाह्यजग आणि आंतर मन यांचा सतत झगडा सुरु असतो. लढाई नेहमी नसते हे तर नित्य आहे ,या सर्वांना धीराने तोंड देण्याची आवश्यकता असते.

लक्ष देऊन पाहिलं तर रोजच्या जगण्यात किती तरी प्रकारची साहस अंगी बाणवावी लागतात.

शेक्सपियरनी म्हटलं आहे

" शूर एकदाच मरतो तर भित्रा मृत्यू पूर्वी अनेकदा मरत असतो"   

रोजच्या जीवनात टक्क टोणपे ,  टीकेचा भडीमार होत असतो टीकेला सामोरे जायला धैय हवं.
धैर्याने आपण खोट्या अहंकाराला आवर घालू शकतो,
चुकीची मतं,विचार धैर्याने बदलू शकतो,
स्वतः शी आणि इतराशी प्रामाणिक  संबंध ठेवण्यास धैर्य  मदत करत असते.
आपली  स्पष्ट मतं मांडता येतात. 
                                जे स्पष्ट पणे असहमती दर्शवतात ते धोकादायक नसुन जे असहमत असून हि सांगत नाहीत ते अधिक धोकादायक असतात.

तुमच्या कडील सामर्थ्य किंवा अधिकार तुम्हाला साहसी ठरवत नाही, तर साहस ही मानसिकता आहे.

प्रयत्नाने साहसी वृत्ती अंगिकारता येते. 

जीवनाच्या अंगाप्रत्यंगात साहस जोपासण्याची आवश्यकता आहे. 

स्वतःची चूक स्वीकारायला साहस लागतं 
मोठी मोठी स्वप्नं बघायला आणि सत्यात उतरावायला साहस आवश्यक. 
इतरांना माफ करण्यासाठी साहस. 
दुस-याचा नकार स्वीकारण्यासाठी धैर्य लागतं 
प्रम करायला धाडस लागतंय 
स्पष्ट बोलायला धैर्य लागतं 
योग्य वेळी रागावण्यासाठी   धाडस हवंच 
विजयात सौजन्य आणि प्रभावात सन्मान राखण्यासाठी धैर्य हवं 
शिकण्या शिकवण्या साठी धीर हवा. 
आणि वास्तवाचा सामना करण्यासाठी हिम्मत हवीच . 

धाडसी वृत्तीने परिस्थिती वर नियंत्रित करता येते. 

फक्त लढाई, रणांगणावर नव्हे तर चांगलं जीवन जगण्यासाठी साहस, धैर्य हवं.   होय ना? 

Monday 19 September 2016

१० वी १२ वी विध्यार्थी मेळावा







यशस्वी होण्यासाठी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं व्यक्तिमत्त्व. आपल्याला काय करायला आवडतं ,
कोणत्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. कोणत्या गोष्टीची भीती वाटते. स्वतःला जाणून घ्या.जाणून घेण्यासाठी कॉलेजच्या उपक्रमात सहभावी व्हा! कॉलेज जीवनाचा , स्वतःला समजण्यासाठी , घडवण्यासाठी उपयॊग करा. वक्तिमत्त्व म्हणजे ओळख असते असे प्रतिपादन श्री अरुण नाईक यांनी विद्यार्थी कौतुक समारंभात केले ते पुढे म्हणाले . जसे धोनी म्हटलं की कॅप्टन कुल , कोहली म्हटलं की अग्रेसिव्ह अशी ओळख आपल्या समोर येते.
आपण प्रत्येक गोष्टी तून काहीतरी शिकत असतो, खेळातून ही आपण शिकत असतो. मांजराच्या पिल्लाचा स्वतःची शेपटी पकडायचा खेळ म्हणजे पिल्लाचा अस्थिर गोष्टी वर एकाग्र होण्याचा सराव असतो त्यातूनच ते उंदीर पकडण्याचं कौशल्य शिकत असतं. सुरवातीला लोहार, सुतार , कुंभार , गवंडी , गवळी इत्यादी पारंपरिक व्यवसाय होते त्याचे शिक्षण आईवडील , कुटुंब , नातेवाईक , एका पिढी कडून दुस-या पिढीला मिळत असे. पुढे व्यवसायाचं स्वरूप बदललं, शिक्षण देणारी व्यवस्था बदलली , शाळा ,आयटीआय ,कॉलेजस आली. शिक्षण व व्यवसाय कसे एकमेकाला पूरक असतात हे त्यांनी शाळा आणि कारखाना यातील कार्यप्रणालीची साम्यस्थळं दाखवून विशद केलं. वेळेवर शाळा भरणे/ सुटणे यावरून वेळेचं व्यवस्थापन शिकवलं जातं.१० वी , १२ वी पर्यंत अभ्यासक्रमाची पुस्तकं (Textbooks) असतात पुढच्या शिक्षणात विषयाचं एकच एक पुस्तक असं नसते तुम्हाला अनेक पुस्तकातून विषय समजून घ्यायचा असतो. कोणताही विषय समजण्यासाठी भाषा चांगली यायला हवी. भाषेसाठी वाचन आवश्यक. स्वतः:हून अभ्यास करता येणे ही पुढची पायरी आहे. त्यासाठी वाचन आणि वाचलेलं किंवा आपल्याला सुचलेली कल्पना योग्य पद्धतीनं मांडता येणे याला संवाद म्हणतात. आपल्याला संवाद साधता आला पाहिजे.
आपल्याकडे व्यवसायाच्या जाती झाल्या , कोणताच व्यवसाय कमी दर्जाचा नसतो. तुमची आवड काय आहे ते पहा. मुद्दा पटवून देताना त्यांनी सलूनचा व्यवसाय करण-या पुण्यातील डॉक्टरांच उदाहरण दिलं .
व्यवसायात अनेक संधी आहेत. हे संधीच युग आहे. लोकांच्या गरजा ओळखायला शिका, आपल्यात योग्य ते बदल करा. नवीन गोष्टी जाणून घ्या! शेवटी त्यांनी विद्यार्थी , पालकांच्या प्रश्नाला उत्तरं दिली
पाहुण्यानी संजीवनीच्या वाचन अभियानाचं कौतुक केल.














कौतुक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जैमुनी पतपेढीचे अध्यक्ष श्री वसंत नाईक होते. पाहुण्याची ओळख , प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राजू नाईक यांनी केले, सौ सपना पाटील हिने सुत्रसंचलन केलं









(१० वी १२ वी विध्यार्थी मेळावा  १७ जुलै २०१६ चंपावती मंदिर )

संस्कृत साहित्य अथांग सागर





संस्कृत साहित्य अथांग सागर आहे त्यातील दैदिप्तमान रत्न म्हणजे कालिदास असं प्रतिपादन प्रा. डॉ  आसावरी बापट यांनी संजीवनी परिवार आयोजित "श्रावणमासी -कालिदास श्रावणी " या कार्यक्रमात केलं.  पुढे  जर्मन  तत्त्ववेत्ता लेखक गटे यांचा संदर्भ देऊन म्हणाल्या "तारुण्याची नव्हाळी आणि परिपक्वता , पृथ्वी आणि स्वर्गाचा आनंद उपभोगायचा असेल तर तुम्हाला तो शाकुंतला नाटकात मिळेल."  

इतिहासाच्या नोंदी नसल्यामुळे कालिदासाचा काळ ठरवणे कठीण आहे आणि उपलब्ध लोकसाहित्या नुसार इस  पूर्व ३०० ते  ६०० दरम्यात असावा. कालिदासाला कवी कुलगुरू , महाकवी म्हटलं जाते. 

कालिदासाची दोन महाकाव्य कुमारसंभव आणि रघुवंश , दोन खंडकाव्य  मेघदूत आणि ऋतुसंहार  आणि तीन नाट्यसंहिता  ‘मालविकाग्निमित्र’, ‘विक्रमोर्वशीय’ आणि ‘अभिज्ञान शाकुन्तल’ 

त्या पुढे म्हणाल्या दोन दिवसात कालिदासाचं साहित्याविषयी बोलणं म्हणजे कालिदासावर आणि  माझ्यावर अन्याय आहे. 







पहिल्या दिवशी त्यांनी  दोन महाकाव्य कुमारसंभव , रघुवंश हि काव्य थोडक्यात विषद केली. राजधर्म सांगणा-या दोन श्लोकांचे निरूपण केलं ,कवी आणि साहित्यिक म्हणून कालिदास कसे प्रगल्भ होत गेले हे उदाहरणा सहित सांगितले. आणि आपल्या निवेदनानं शकुंतला हे नाटक प्रत्यक्ष उभं केलं

संस्कृत भाषेचं वैभव उभे करताना त्यांनी काही उदाहरणं दिली जसं  अरण्य (रण नाही ते )   पत्नी दारा  कलत्र ,नेमकं   शब्द  नियोजन  हे कालिदास वैशिष्ट्य असल्याचं सांगितले. 

 




दुसरे पुष्प मेघदूत वर गुंफताना मॅडम म्हणाल्या कालिदासचं मेघदूत हे सर्वात जास्त भाषांतर झालेलं काव्य आहे त्याच्यावर ९२ टीका प्रसिद्ध झाल्या आहेत. (टीका म्हणजे अभ्यासपूर्ण विवेचन   )

१११ श्लोक ४४४ चरणाचं काव्य.  

कुबेराच्या दरबारातील यक्षाला त्याच्या कामचुकारपणामुळे  प्रिय व्यक्तीच्या विरहाचा शाप मिळाला आहे. विरहात होणारी तळमळ, काळजी, एकमेकांची ख्याली खुशाली कळावी म्हणून होणारी तगमग, मग कोणाकडून संदेश देता  येईल, कोणाला दूत म्हणून पाठवता येईल, कालिदास आपल्या कवी कल्पनेने मेघाला दूत करतो. आणि यक्ष आपला संदेश या दूता करवी आपल्या प्रेयसीला हिमालयात धाडतो. हे काव्याचं कथानक. 

ह्या काव्यात  निसर्ग आहे , भूगोल आहे. मेघाचं जीवन चक्र आहे. हिमालयातील निसर्ग दर्शन आहे, श्रुंगारच सूचन आहेच, मर्यादाचं पालन आहे.  
उपमा कालिदासानंच द्याव्या 

सुरवातीलाच हेमंत नाईक याने प्रास्ताविक करताना म्हटलं कि  भारतीय जीवन मूल्य , संस्कृती, साहित्य , थोर परंपरांचा वारसा आपल्याला लाभला आहे, त्याची ओळख व्हावी म्हणून  संजीवनी श्रावणात अभ्यासवर्गाचं आयोजन करत असते या अगोदर श्री सायनेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली  भगवतगीता अभ्यास , श्री शांकरदर्शन असे वर्ग झाले त्याचा पुढचा भाग म्हणजे श्रावणमासी कालिदास श्रवणी.
 



समारोपा समयी कमलाकर पाटील यांनी प्रा. बापट मॅडमचे आभार मानले. त्यांच्याविषयी व श्रोतेवृंदा प्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

(२०,२१ ऑगस्ट २०१६ )