Tuesday 31 March 2020

कोरोनाव्हायरस नंतरचे जग - युवल नोहा हरारी


 

हे वादळ निघून जाईल., आपण  निवडलेल्या पर्यायामुळे  आयुष्य  बदलेल !

 आज मानवजातीला जागतिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कदाचित आपल्या पिढीपुढील सर्वात मोठे संकट. या परिस्थितीत लोक आणि सरकार घेत असलेले निर्णय कदाचित पुढच्या काही वर्षांसाठी जगाला वेगळा आकार देतील. ते केवळ आपल्या आरोग्य व्यवस्थाच नव्हे तर आपली अर्थव्यवस्था, राजकारण आणि संस्कृतीत देखील बदल घडवून आणतील . आपण जलद आणि निर्णायक पद्धतीने कार्य केले पाहिजे अशी आजची निकड आहे परंतु हे करताना निर्णयाच्या दीर्घकालीन परिणामाचा देखील विचार केला पाहिजे. उपलब्ध पर्यायांमधील पर्याय निवडताना धोक्यावर फक्त मात करायची नाही तर वादळ संपल्यानंतर आपण कोणत्या प्रकारचे जग निर्माण करणार आहोत ह्याचा विचार केला पाहिजे. होय, वादळ संपुष्टात येईल, मानवजातीचे अस्तित्व टिकेल, परंतु आपण एका वेगळ्या जगात राहू.

आपत्काला साठी योजलेले उपाय जीवनाचे एक भाग होऊन जातात. सामान्य काळात विचार-विमर्श करून घेतले जाणारे निर्णय आणीबाणीत काही तासांत घेतले जातात. अपरिपक्व आणि अगदी धोकादायक तंत्रज्ञान सुद्धा सेवेमध्ये आणले जाते. इतर वेळी शैक्षणिक मंडळ व्यवसाय यांनी घरून काम करण्यास परवानगी दिली नसती या स्थितीत वर्क फ्रॉम होम पटकन स्वीकारलं गेलं या संकटाच्या वेळी आपल्यासमोर दोन महत्वाचे पर्याय आहेत. पहिला सरकारची निरंकुश पाळत स्वीकारणे किंवा नागरिक सबलीकरणा चा आग्रह धरणे. दुसरा प्रखर राष्ट्रवाद किंवा वैश्विक ऐक्य. या संकटातून वाचण्यासाठी संपूर्ण मानवजातीने काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. हे साध्य करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. लोकांची देखरेख करणे आणि नियम मोडणा-्यांना शिक्षा देणे ही सरकारची एक पद्धत आहे. आज, मानवी इतिहासामध्ये प्रथमच तंत्रज्ञानामुळे सर्वांचे निरीक्षण करणे शक्य होते.

कोरोनव्हायरस साथीच्या विरूद्धच्या लढाईत अनेक सरकारांनी नवीन पाळत ठेवण्याची साधने यापूर्वीच तैनात केली आहेत. सर्वात उल्लेखनीय प्रकरण चीनचे आहे. लोकांच्या स्मार्टफोनचे बारकाईने निरीक्षण करून, कोट्यावधी चेहरा-ओळखणारे कॅमेरे वापरणे आणि लोकांना त्यांचे शरीराचे तापमान आणि वैद्यकीय स्थिती तपासून अहवाल देण्यास प्रवूत्त करण्यात आले आहे. , चीनी अधिकारी केवळ संशयित कोरोनाव्हायरस चे वाहकच त्वरीत ओळखून थांबत नाहीत तर त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतात.

 अलीकडच्या काळात दोन्ही, सरकारे आणि कॉर्पोरेशन्स लोकांचा मागोवा घेण्यासाठी, देखरेखीसाठी आणि हाताळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत करत आहेत. जर आपण सावधगिरी बाळगली नाही, तर आपल्याला कळणार ही नाही की आपल्यावर पाळत ठेवली जात आहे.

 एका काल्पनिक सरकारचा विचार करा ज्याने अशी मागणी केली की प्रत्येक नागरिकाने दिवसाचे 24 तास शरीराचे तपमान आणि हृदय गती नियंत्रित करणारे बायोमेट्रिक ब्रेसलेट घालावे. सरकारी अल्गोरिदमद्वारे काढलेला डेटा एकत्रित केला जाईल आणि त्याचे विश्लेषण केले जाईल आपल्याला समजण्यापूर्वीच आपण आजारी असल्याचा नित्कर्ष काढला जाईल. आपण कोठे होता आणि कोणास भेटलात हे देखील त्यांना समजेल. साथीची लागण थांबवू शकू. नकारात्मक बाजू ही आहे की ही एक भयानक नवीन पाळत ठेवण्याच्या प्रणालीला कायदेशीरपणा येईल, जर कॉर्पोरेशन आणि सरकारांनी आमचा बायोमेट्रिक डेटा काढणे सुरू केले तर ते या माहितीच्या आधारे ते आपल्या आवडी निवडी अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतील आणि मग ते आपल्या भावनांचा अंदाज लावतीलच त्याचबरोबर आपल्या भाव भावनां मध्ये बदल घडवून आणू शकतील , प्रभाव पडू शकतील

 

आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरता उपाय म्हणून बायोमेट्रिक पाळत आपण स्वीकारू. आणीबाणी संपली की ती निघून जाईल. परंतु  तात्पुरत्या उपाययोजनां निघून जात नाहीत हा अनुभव आहे आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि कोरोनाव्हायरस महामारी थांबविण्या साठी , निरंकुश पाळत ठेवण्याची यंत्रणा स्वीकारू नये तर नागरिकांना सक्षम बनवायला हवे. लोकांना वैज्ञानिक तथ्ये सांगितले पाहिजे . सरकार अधिकारीवर्ग यांनी लोकांना विश्वासात घेऊन काही निर्णय घेतले  तर लोक स्वखुशीने निर्णय पाळतील.

अनुपालन आणि सहकार्यासाठी विश्वास आवश्यक आहे. लोकांना विज्ञानावर विश्वास ठेवण्याची, सार्वजनिक अधिका -यांवर विश्वास ठेवण्याची आणि माध्यमांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बेजबाबदार राजकारण्यांनी, विज्ञानावर, सार्वजनिक प्राधिकरणांवर आणि माध्यमांवर चा   विश्वास जाणीवपूर्वक कमी केला आहे. आता हेच बेजबाबदार राजकारणी हुकूमशाही आणतील .  आपण नवीन तंत्रज्ञानाचा नक्कीच उपयोग केला पाहिजे, परंतु या तंत्रज्ञानाने नागरिकांना  सक्षम बनविले पाहिजे. आम्हाला जागतिक योजनेची आवश्यकता आहे. आपण निवडलेला दुसरा महत्त्वाचा पर्याय म्हणजे प्रखर राष्ट्रवाद किंवा वैश्विक ऐक्य . साथीची रोग आणि परिणामी आर्थिक संकट दोन्ही जागतिक समस्या आहेत..  केवळ जागतिक सहकार्याने त्यांचे प्रभावीपणे निराकरण केले जाऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हायरसचा पराभव करण्यासाठी  जागतिक स्तरावर माहिती सामायिक करणे आवश्यक आहे. चीनमधील कोरोनाव्हायरस आणि अमेरिकेतील कोरोनाव्हायरस ची लक्षणं सारखी आहेत . परंतु चीन, अमेरिकेला कोरोनाव्हायरस आणि साथीला  सामोरे           कसे  जावे याबद्दल मौल्यवान माहिती देऊ शकते. एका इटालियन डॉक्टरला पहाटे मिलानमध्ये काय सापडले ते कदाचित संध्याकाळपर्यंत तेहरानमध्ये जीव वाचवू शकेल. परंतु हे होण्यासाठी, जागतिक सहकार्याची आणि विश्वासाच्या भावनेची गरज आहे.

देशांनी  माहिती सामायिक करण्यास आणि नम्रपणे सल्ला स्वीकारण्यास तयार असले पाहिजे आणि त्यांनी प्राप्त केलेल्या डेटा आणि अनुभवावर विश्वास ठेवला पाहिजे. वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी आणि वितरणासाठी जागतिक प्रयत्नांची देखील आवश्यकता आहे.  युद्धाच्या वेळी प्रमुख उद्योगांचे राष्ट्रीयकरण करतात, त्याचप्रमाणे कोरोनाव्हायरस विरूद्ध  युद्धासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण उत्पादनं मानवीय करण्याची आवश्यकता असू शकते.  श्रीमंत देशाने गरीब देशाला मौल्यवान उपकरणे पाठविण्यास तयार असले पाहिजे, आर्थिक आघाडीवरही जागतिक सहकार्याची नितांत आवश्यकता आहे.

जागतिक विमान प्रवासा संबधी करार होणे आवश्यक आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास महिन्यांपासून थांबविणे प्रचंड नुकसानीचे आहे  आणि कोरोनाव्हायरस  विरूद्ध युद्धाला अडथळा आणेल. देशांनी गरज असलेल्या वैज्ञानिक, डॉक्टर, पत्रकार, राजकारणी, व्यावसायिक. यांना त्यांच्या मूळ देशाद्वारे पूर्व-तपासणीची अट घालून प्रवासाची सुविधा द्यायला हवी.

प्रत्येक संकट ही एक संधी आहे. आपण आशा बाळगली पाहिजे की सध्याच्या साथीच्या रोगामुळे मानवजातीस जागतिक मतभेदांमुळे उद्भवणार्‍या तीव्र धोक्याची जाणीव होईल. आपण मतभेद निवडल्यास, हे संकट फक्त   लांबणीवर पडणार नाहीतर भविष्यात कदाचित आणखी वाईट आपत्तींना सामोरे जावे लागेल .जर वैश्विक सदभाव निवडला तर ते केवळ कोरोनाव्हायरसच नव्हे तर भविष्यातील सर्व साथीच्या आणि 21 व्या शतकातील मानवजातीला त्रास देणार्‍या सर्व संकटांविरुद्धही विजय ठरेल.




(युवान नोहा हरारी यांच्या लेखाचा स्वैर भाषांतर, त्रुटी अर्थातच माझी )

Wednesday 11 March 2020

साहिर लुधियानवी

 
प्रसिद्ध गीतकार उर्दू कवी साहिर लुधियानवी (८ मार्च १९२१ - २५ अक्टूबर १९८०) यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्या कविते विषयी, गीता विषयी आजचे दुसरे एक महाकवी
साहिर लुधियानवी यांचे खरे नाव अब्दुल हयी. त्यांचा जन्म ८ मार्च १९२१ रोजी लुधियाना येथे झाला. लुधियानात साहिर यांनी शिक्षण घेऊन काही काळ दिल्लीत राहून मग मुंबईकडे मोर्चा वळवला. प्राचार्यांच्या हिरवळीवर एका मुलीसोबत बसल्यामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही टाकलेले होते. साहिर यांच्या आयुष्यात अनेक प्रेमिका आल्या त्या सर्वांमधील एक ज्ञान पीठ पुरस्कार विजेत्या ‘अमृता प्रीतम’.
Image result for साहिर लुधियानवी in Marathi

साहिर लुधियानवी.. उर्दू शायरी आणि हिंदी चित्रपटगीतांचे अद्वितीय जादूगार. भावनांचे पोकळ बुडबुडे त्यांनी कधीच काढले नाहीत. ज्यांच्या गीतांना संगीत देण्याने संगीतकारांना दैवी अनुभूती येत असे, अशा साहिरजींची आज (८ मार्च) रोजी जन्मशताब्दी सुरू होत आहे. यानिमित्ताने त्यांचे समकालीन ज्येष्ठ कवी व गीतकार गुलज़ार यांनी त्यांच्या चित्रपटगीतांच्या अनवटपणावर टाकलेला झोत..


खालील लेखात साहिरजींच्या शायरीतून प्रतीत होणारे त्यांचे दु:खभारले व्यक्तिमत्त्व..


ताजमहाल ही दोन व्यक्तींची निर्मिती होय. एक शाहजहानची.. संगमरवरातली आणि आग्य्राला उभी असलेली. दुसरी आहे ती उर्दूत लिहिलेली, साहित्यात विराजमान झालेली, साहिर लुधियानवींच्या नावावर असलेली..


दोन्ही आहेत प्रेमाची प्रतीकं. आणि ती दोन्ही अमर्त्य आहेत. पहिली कलाकृती आहे ती शाहजहानची प्रेमिका मुमताज हिची आठवण सांगणारी. आणि दुसरी आहे ती साहिर लुधियानवींनी आपल्या प्रेमिकेला उद्देशून केलेली; पण तिच्या नावाचा उल्लेख नाही केलेला. फक्त एवढंच म्हटलंय की, ‘मेरी मेहबूब, कहीं और मिला कर मुझसे..


प्रिये, कुठेतरी दुसरीकडे भेटत जा मला.’


ही ऩज्म- ही कविता- हवी तर वाचा. इथे उद्धृत करतो आहे..


ताजमहल
ताज तेरे लिए इक मज़हर-ए-उल्फ़त ही सही
तुमको इस वादी-ए-रंगीं से अक़ीदत ही सही
मेरी मेहबूब, कहीं और मिला कर मुझसे!
ब़ज्मे-शाही में ग़रीबों का गुज़र क्या मानी?
सब्त जिस राह पे हों सतवते-शाही के निशाँ
उसपे उल्फ़त भरी रूहों का सफ़र क्या मानी?
मेरी मेहबूब, पस-ए-पर्दा-ए-तशहीर-ए-वफ़ा
तूने सतवत के निशानों को तो देखा होगा
मुर्दा शाहों के मक़ाबिर से बहलने वाली!
अपने तारीक़ मकानों को तो देखा होता
अनगिनत लोगों ने दुनिया में मुहब्बत की है
कौन कहता है कि सादिक़ न थे ज़ज्बे उनके?
लेकिन उनके लिए तशहीर का सामान नहीं
क्यों कि वो लोग भी अपनी ही तरह मुफ़लिस थे
ये इमारातो-मक़ाबिर, ये फसीलें, ये हिसार
मुतलक़-उल-हुक्म शहन्शाहों की अज़्‍ा मत के सुतूँ
दामन-ए-दहर पे उस रंग की गुलकारी हैं
जिस में शामिल है तेरे और मेरे अजदाद का खूँ
मेरी मेहबूब! उन्हें भी तो मुहब्बत होगी
जिनकी सन्नाई ने बख़्शी है इन्हें शक्ल-ए-जमील
उनके प्यारों के मक़ाबिर रहे बे-नाम-व-नमूद
आज तक उनपे जलाई न किसीने क़ंदील
ये चमनज़ार, ये जमुना का किनारा, ये महल
ये मुऩक्क़श दरो-दीवार, ये मेहराब, या ताक़
इक शहन्शाह ने दौलत का सहारा लेकर
हम ग़रीबों की मुहब्बत का उडमया है मज़ाक
मेरी मेहबूब, कहीं और मिला कर मुझसे


(ताज हे प्रेमाचं प्रकटीकरण खरं तुझ्या लेखी,
या रम्य ठिकाणाविषयी भक्तिभावही असेल तुझ्या मनी
(तरीही) प्रिये, कुठेतरी दुसरीकडे भेटत जा मला.
शाही दरबारात कोण विचारतो गरीबांना?
शाही वैभवाच्या खुणा ल्यालेल्या मार्गावर
प्रेमिकांचे आत्मे काय करणार मार्गक्रमणा?
प्रिये, प्रेमाच्या जाहिरातीच्या पडद्याआड लपलेल्या
वैभवाच्या खुणा तरी पाहायच्या होत्यास..
मृत बादशहांच्या मकबऱ्यांमध्ये रमणाऱ्या प्रिये,
आपल्या अंधारल्या घरांकडे तरी पाहायचं होतंस..
जगात असंख्य लोकांनी प्रेम केलंय ग
कोण म्हणतं, शुद्ध नव्हत्या भावना त्यांच्या?
पण त्यांच्यापाशी नव्हती जाहिरात करण्याची साधनं
कारण ते लोकही होते आपल्यासारखेच निष्कांचन
या इमारती, हे मकबरे, हे बुरूज-गड-किल्ले
स्वेच्छाचारी सम्राटांच्या महानतेचे हे स्तंभ-
हे स्तंभ म्हणजे विश्वाच्या वस्त्रावरची रंगीत नक्षी
या नक्षीत मिसळलंय तुझ्या-माझ्या बापजाद्यांचं रक्त
प्रिये, ज्यांच्या कारागिरीनं बहाल केलं हे सुंदर रूप
ताजमहालाला, त्यांनीदेखील केलंच असेल प्रेम
त्यांच्या प्रियजनांच्या कबरींवर नाही नाव-निशाणी
दिवादेखील कधी तिथे नाही लावला कुणी
हा बगीचा, यमुनेचा हा काठ, हा महाल
नक्षीनं नटलेले दरवाजे-भिंती, कमानी, कोनाडे..
संपत्तीच्या जोरावर एका सम्राटानं
आपल्या प्रेमाची उडवलेली खिल्ली आहे ही!
प्रिये, कुठेतरी दुसरीकडे भेटत जा मला)


परंतु आज साहिर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्तानं माझ्याकडे चित्रपटांतल्या त्यांच्या गाण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, म्हणून केवळ त्यांच्याविषयीच बोलतो.


अनुभव असा असतो की चित्रपटातली गाणी ‘हिट्’ होतात, म्हणजेच सामान्यांकडून आणि असामान्यांकडून पसंतीची पावती त्यांना मिळते, तेव्हा त्याचं पहिलं कारण असतं, ते म्हणजे त्यांची ‘चाल.’ शब्दांचा नंबर दुसरा. कधी कधी तर तिसरादेखील. म्हणजे जेव्हा ती गाणी लता मंगेशकर, किशोरकुमार किंवा मोहम्मद रफींसारख्या गायकांनी गायिलेली असतात. तेव्हा शब्द हे चालीला लगाम घालायचं काम करतात; प्रत्यक्ष धावायचं काम करते ती ‘चाल.’


परंतु शब्दांमुळे, शायरीमुळे गाणं हिट् व्हावं हे मोठेपण केवळ दोघांनाच लाभलं. एक होते पंडित प्रदीप आणि दुसरे साहिर लुधियानवी.
पंडित प्रदीप अनेकदा तर स्वत:ची गाणी स्वत:च गातही असत. त्यांची गाणी त्यांच्या सामाजिक आवाहनासाठी प्रसिद्धी पावली. उदा.
‘दूर हटो ऐ दुनिया वालो, हिंदुस्तान हमारा है’
किंवा-
‘देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान
कितना बदल गया इन्सान।’
पण साहिरचा अवकाश खूप मोठा आहे. एखाद्या शायरानं चित्रपट माध्यम जवळ करू नये, तर चित्रपट माध्यमानंच त्या शायराकडे यावं, त्याला आपलं म्हणावं, हे इथे प्रथमच घडलं होतं. हा शायर जे, जसं लिहीत होता ते, तसंच राहिलं या माध्यमात.


‘जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला।’
**
‘जिन्हें नाज़ है हिंद पर वो कहाँ हैं?’
**
‘मैंने चाँद और सितारों की तमन्ना की थी।’


प्रेमात वाटय़ाला येणारं उदासवाणेपण अनेकांनी रडून- भेकून व्यक्त केलं. पण..
‘चलो इक बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनों..
वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन
उसे इक ख़ूबसूरत मोड देकर छोडना अच्छा..’


अशा शब्दांत इतर कुणीच नाही व्यक्त केलं ते.


शब्दांची त्यांची निवड त्यांच्या साऱ्या पूर्वसूरी शायरांहून अगदी वेगळीच होती. त्यांच्या उपमा आणि त्यांची रूपकंसुद्धा सर्वाहून वेगळीच होती.


‘पेडो की शाख़ों पे सोई सोई चाँदनी


तेरे ख़यालों में खोई खोई चाँदनी
और थोडी देर में थक के लौट जाएगी


रात ये बहार की फिर कभी न आएगी
दो एक पल और है ये समाँ


सुन जा दिल की दास्ताँ
ये रात ये चाँदनी फिर कहाँ ..’


इतकं नाजूक, हळुवार प्रतिमाविश्व साहिरच्या आगमनापूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं कुणी. साहिरच्या शब्दांमध्ये, त्याच्या शैलीमध्ये रोमान्स भरून राहिला होता. काठोकाठ रोमान्स. व्यथेला साहिरइतक्या सुंदर आणि प्रभावी ढंगात कुणीच व्यक्त नव्हतं केलं. किती दाखले द्यावेत.


‘मेरे ख़्वाबों के झरोखों को सजाने वाली
तेरे ख़्वाबों में कहीं मेरा गुज़र है कि नहीं?’
**
‘रात सुनसान थी, बोझल थीं फ़ज़ा की साँसें
रूह पर छाए थे बे-नाम ग़मों के साए’
**
‘तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं
तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी’
**
‘मैंने शायद तुम्हें पहले भी कहीं देखा है’


एवढंच नाही, तर साहिरची शब्दकळा जरी नेहमी उर्दूचीच होती, तरी ज्या ज्या वेळी त्यांनी हिंदी शब्दकळेचा अवलंब केला तेव्हाही ती आपला एक आगळा बाज घेऊनच आली-
‘मन रे तू काहे न धीर धरे?’
**
‘आज सजन मोहे अंग लगा लो जनम सफल हो जाए
हृदय की पीड़ा, देह की अगनी, सब शीतल हो जाए’
**
‘बस्ती बस्ती परबत परबत गाता जाए बन्जारा
ले कर दिल का इकतारा।’


खरंच, साहिर लुधियानवी जादूगारच होते.


अनुवाद : रेखा देशपांडे