Monday 21 February 2022

दृष्टिकोन बघा, बनवा !!

 श्री सत्या नाडेला,  मायक्रोसॉफ्टचे सीईओ यांनी सांगितलेल्या  7 छोट्या हृदयस्पर्शी कथा.  जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलू शकतील आणि  चांगली व्यक्ती घडवू शकतील  अश्या कथा. 


1 सुखद आठवणी ,*मागे वळून पाहता "
 मी माझ्या मानसशास्त्र विषयातील संशोधन प्रबंधा साठी माझ्या आजीची मुलाखत घेत होतो  जेव्हा मी तिला यशाची व्याख्या तिच्याच शब्दात करायला सांगितली तेव्हा ती म्हणाली. "यश म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याकडे मागे वळून पाहता आणि आठवणी तुम्हाला आनंदी करतात. हसू आणतात. 

२*प्रेम दुखावर विजय मिळवते* 
माझा  लाडका  कुत्रा गाडी खाली आला, ते पाहताना मला अतीव दुःख झाला  मी त्याला धरून रडत रस्त्याच्या कडेला बसलो. त्या अंतिम क्षणीही   मरण्यापूर्वी त्याने माझ्या चेहऱ्यावरील अश्रू चाटले.प्रेम उभारी देते.  

3 *एकत्वाची भावना. 
 माझे वडील, माझे तीन भाऊ आणि दोन बहिणी माझ्या आईच्या हॉस्पिटलच्या बेडभोवती उभे असताना, माझ्या आईने तिचा मृत्यू होण्यापूर्वी तिचे शेवटचे सुसंगत शब्द उच्चारले. ती सहज म्हणाली, *मला सध्या खूप प्रेम वाटत आहे. आपण असे वारंवार एकत्र यायला हवे होते.*

4 ममत्व 
माझे वडील एका लहानशा हॉस्पिटल मधे शेवट्याच्या घटका मोजत होते. मी त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले. ते गेल्यानंतर माझ्या लक्षात आले की मी लहान असताना पहिल्यांदा त्याचं चुंबन घेतलं होतं. 
  
5 *आनंद*
 जेव्हा मी 27 वर्षीय कॅन्सरग्रस्त रुग्णाला तिच्या 2 वर्षांच्या मुलीच्या माकड्चाळ्या वर  खळखळून  हसताना पाहिले तेव्हा मला अचानक जाणवले की *मला माझ्या आयुष्याबद्दल तक्रार करणे थांबवायला  हवे  आणि जीवन आनंदाने  साजरे करायला हवे.*

6 *दया*
 व्हीलचेअरवर बसलेल्या एका मुलाने मला माझ्या लंगड्या  पायाने कुबडीच्या साह्याने चालताना  पाहिलं. पाठीवरील ओझे आणि  पुस्तके बघून त्याने मदत देऊ केली. व मला माझ्या वर्गापर्यंत सोडलं. निघताना तो म्हणाला,  मला आशा आहे की तुम्ही  लवकरच बरे व्हाल! 

7 वाटून घेणे. 
 मी केनियामध्ये प्रवास करत असताना  झिम्बाब्वेमधील एका निर्वासिताची भेट झाली. त्याने सांगितले की त्याने 3 दिवसांहुन  अधिक काळ अन्नाचा कण ही  खाल्ला  नाही.  तो अत्यंत हाडकुळा आणि अस्वस्थ दिसत होता.  माझ्या मित्राने तो  खात असलेले  सँडविच  त्याला देऊ केले,     *त्या माणसाने चटकन सांगितले की  आपण वाटून खाऊ शकतो,  
आपल्या कडील म्हणीची आठवण करून देणारा प्रसंग एक तीळ सात जणात वाटून घ्या, वाटून घेणे (SHARING)  आपल्या  जीवनाचे एक तत्व बनवू या ....

 *"कृतज्ञता जीवनाचा स्थायीभाव असु द्या !! जीवन उत्सव होईल !!!

Tuesday 1 February 2022

राफेल नदाल- विक्रमी २१वे ग्रँड स्लॅम",



स्पेनच्या राफेल नदालने रविवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि विक्रमी २१व्या ग्रँड स्लॅम वर आपले नाव कोरले. त्याच्या या कामगिरीचं वर्णन वृत्तपत्रांनी तीन शब्दात केलं . 
"अद्भुत, अविश्वसनीय, असामान्य…; राफेल नदालचे विक्रमी २१वे ग्रँड स्लॅम",   
"राखेतून उठला राफएल नदाल; ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून इतिहास घडवला" 
हो परिस्थिती तशीच होती. 
नदाल वय वर्ष ३५ 
प्रतिस्पर्धी  दहा वर्षांनी तरुण. 
नदालने दोन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये फ्रेंच स्पर्धेत विसावे ग्रँड स्लॅम जिंकले. यानंतर दुखापती, करोनामुळे सराव आणि सहभागावर येत असलेल्या मर्यादा आणि वाढते वय. 
 पाचव्या सेट मध्ये ५-५ अशी बरोबरी साधत रशियाचा डॅनिल मेदवेदेव ने  देखील हार मानली नव्हती, 
हाच  मेदवेदेव  जोकोव्हिचच्या  २१ व्या ग्रँड स्लॅमच्या आड आला होता.  
तीस-या सेटच्या वेळी स्पर्धेची कृत्रिम बुद्धिमत्ता सांगत होती कि मेदवेदेव ला जिंकण्याची संधी ९६% टक्के आहे. याचाच अर्थ नदाल नक्कीच हरणार. 
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा या वर जग पटकन विश्वास ठेवते. 
परंतु अविश्वसनीय तंदुरुस्ती आणि असामान्य जिद्द याच्या जोरावर नदाल ने विजयश्री घेचून घेतली. 
मेहनत , सराव , जिद्द, चिवटपणा  विजयाची आस यासर्व गोष्टीत  दोघे स्पर्धक तुलबळ्य होते. तारूण्य  मेदवेदेव च्या बाजूला होते तर अनुभव नदाल च्या बाजूने. . 
खेळाच्या भाषेत सांगायचं झालं तर कालचा दिवस नदाल चा होता. 
जिंकण्याचा ध्यास, मेहनत, तंदुरुस्ती , झोकून द्यायची वृत्ती आणि दैव. 
भगवद गीता सांगते  "दैवम चैत्राव पंचमम"  , शेवटी  दैवाला अनन्यसाधारण महत्त्व असते. हो शेवटी!
दैव नदालच्या या वयातील तंदुरुस्ती , जिद्दीवर फिदा   झाले.