Saturday 24 October 2015

द रोड नॉट टेकन - कविता

रॉबर्ट फ्रॉस्ट यांची ‘द रोड नॉट टेकन’ ही कवितेला  शंभर वर्ष झाली. ‘आवडती कविता प्रकल्पा’द्वारे अमेरिकेतील लोकांना आवडती कविता निवडण्यासाठी आवाहन केले होते. १८००० निवडलेल्या कवितांमध्ये सर्वात जास्त ‘द रोड नॉट टेकन’ला पसंती दर्शविली होती. बहुतेकदा वाचकांकडून या कवितेचे शीर्षक ‘द रोड नॉट टेकन’ऐवजी ‘द रोड लेस ट्रॅव्हल्ड’ अशी गफलत केली जाते. मूळ कविता अशी

 

The Road Not Taken  By Robert Frost 1874–1963

Two roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both
And be one traveler, long I stood
And looked down one as far as I could
To where it bent in the undergrowth;


Then took the other, as just as fair,
And having perhaps the better claim,
Because it was grassy and wanted wear;
Though as for that the passing there
Had worn them really about the same,


And both that morning equally lay
In leaves no step had trodden black.
Oh, I kept the first for another day!
Yet knowing how way leads on to way,
I doubted if I should ever come back.


I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I—
I took the one less traveled by,
And that has made all the difference.


घनदाट जंगलात  एकमेकापासून  दूर जणारे रस्ते,
एक प्रवासी म्हणून दोन्ही वर चालता येणार नाही ,
मन खंतावते,मी ताटकळत उभा राहतो.  
आणि जंगलातून वेडीवाकडी वळणं घेत गेलेल्या, 
एका वर नजर पोहचेल तिथवर पाहतो. 

नंतर दुसरा घेतला , नितांत सुंदर ,
आणि कदाचित चांगला पर्याय होता,
कारण गवतफुलांनी  नटलेला. 
जरी खूप वर्दळ होती 
त्यामुळे नि:संशयपणे खूप थकलेला. 

आणि त्या पहाटे दोन्ही हि सारखेच सुस्त  होते.
पाला पाचोळा वर  पाऊलखुणा नव्हत्या,
मी पहिला पुढे  कधीतरी म्हणून ठेवला
माहित नाही  हा मार्ग कुठ घेऊन जाईल. 
मलाच शंका आहे , मी परत येईन!

  नि:श्वास टाकून मी सांगत राहीन
इथून पुढे कधी तरी युगानुयुगे :
जंगलात दोन रस्ते फुटले होते आणि मी-
मी जो कमी मळलेला होता तो निवडला
आणि त्यामुळंच सारं काही बदलून गेलं.

 

Thursday 22 October 2015

जाणीव चुकांची

युवर एरोनिअस झोन्स हे डॉक्टर वेन डायर याचं पहिले पुस्तक. जे एक वर्षाहून अधिक काळ बेस्ट सेलर म्हणून राहिलं आहे. एरर म्हणजे चूक. 
 
Image result for your erroneous zonesएरोनिअस झोन्स  म्हणजे आयुष्य जगताना आपण करत असलेल्या चुका ,हे पुस्तक वाचताना एक गोष्ट लक्षात येईल कि आपल्या भावना वर आपण  नियत्रण करू शकतो. जीवनात जी  स्थिती उदभवते  किंवा ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतो,  ती स्थिती किंवा परिस्थिती  आपल्या भावनाची  किंवा प्रतिक्रियांची निर्मिती असते. भावना किंवा प्रतिक्रियेची आपण निवड करत असतो प्रसंग,वस्तू किंवा माणसा विषयी आपण भावना व्यक्त करत असतो किंवा प्रतिक्रिया देत असतो.  आपण निवड करणारी एक  व्यक्ती असतो. या पुस्तकात ते आपल्या चुकीच्या मानसिकतेचे विश्लेषण करतात व त्यावर मात करण्याचे उपाय सुचवतात. 
 

 
दोन विशेष /मुद्धे मांडतात :  आपण कोण आहोत, असायला हवे हे आपणच ठरवत असतो आणि   चालू क्षणा वर आपण ताबा घ्यायला हवा. जीवनाच्या प्रवाहात आपण काही चुकीच्या संकल्पना मानत आलो आहोत. 
 
 
बहुतेक   वेळा काही विपरीत घडल्यावर त्याची जबाबदारी   झटकून परिस्थितीला किंवा दुस-याला आपण  दोषी ठरवत असतो. जीवनात घडणा-या  प्रत्येक गोष्टीला आपण स्वत: जबाबदार असतो ,आहोत.
नवीन असं  काही नाही, आपण आपले विचार संयमित करत असतो, ज्याचा परिणाम आपल्या भावना वर होत असतो,त्यातूनच क्रिया , प्रीतीक्रिया घडत असते . 

आपण जे करू इच्छितो  त्यामध्ये नकारात्मक विचार खो घालते ते करण्या पासून परावृत्त करते उदाहरण द्यायचं झाल्यास लाजाळू पणा मुळे तुम्ही आपल्या आवडीच्या माणसाला ओळख करून देत नाहीत. 

लहानपणा पासून आपल्या वर  नकारात्मक विचाराचा प्रभाव असतो. हे करू नका , ते करू नका  , हे तुम्हाला जमणार नाही , ते आपले काम नाही असे विचार आदळत असतात. हे सर्व टाळायला हवे.   हे बदलून सकारात्मक विचार आत्मसात करणे कठीण आहे परंतु सकारत्मक विचारानेच आपण प्रगती करू शकू. 
 
जीवनात मोठे होण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आपल्यात काही कमी आहे, काही मिळवायचे आहे त्यासाठी केलेली मेहनत दुय्यम मानली जाते. दुसरा एक विचार म्हणजे जीवन प्रवाह म्हणजे जीवनमानात सतत होणारी वाढ. अश्या वाढी मुळे जीवन अधिक समृध्द होते, आनंदी बनते.  
 

स्वत: वर प्रेम करा 
असं म्हटलं जातं कि जो स्वत:वर प्रेम करू शकत नाही, तो दुस-यावर प्रेम करू शकणार नाही. स्वत: वर प्रेम करणे म्हणजे आपण जसे आहोत तसा स्वीकार करणे. त्याने स्वत:ची एक सकारात्मक प्रतिमा तयार होते. 

स्वत:ला कमी लेखण हि एक पळवाट/ सबब  आहे.  (उदा.  काही गोष्टी न करण्यासाठी  अशी कारणं  दिली जातात   ….  मी जाड आहे, लंबू आहे, त्यामुळे …. . मी रागीट , मी लाजाळू आहे त्यामुळे …. )

संमती (Approval)
 
इतरानी केलेली प्रशंसा , दिलेली  मान्यता/संमती सर्वाना आवडते , आनंददायी  वाटते, तथापि ती आपली गरज असू नये.  आपले  अस्तित्त्व जर दुस-याच्या मान्यतेवर   /संमती वर   अवलंबून असेल तर त्यांनी मान्यता काढून घेतल्यावर कोसळून जाईल.   दुसरे काय म्हणतात याची चिंता करत  राहिलो तर आपण आनंदी राहू शकत नाही. 

 संमती / मान्यतेची गरज का वाटते?
 
जबाबदारी दुस-यावर टाकण्याची वृत्ती ,  तुम्ही दु:खी कष्टी आहात कारण इतरांमुळे
कोणी सांगितल्या शिवाय पुढाकार न घेणे, 
संमतीच्या आवश्यक्यते मुळे तम्ही स्वत:ला गरीब बिच्चारे बनवता. त्यांमुळे काही करू शकत नाही अशी प्रतिमा तयार होते. 
 
 स्वत:ला पटलेल्या गोष्टी करा.  कोणीही तुम्हाला कमी लेखू शकत नाही जो पर्यत तुम्ही स्वत: तसे वाटून घेत नाहीत

खंत, दोषी / चिंता, काळजी 
खंत भूतकाळाशी निगडीत आहे तर चिंता काळजी भविष्याविषयी असते. दोन्ही गोष्टी वर्तमान काळातील आनंद हिरावून घेण्याचे काम करत असतात.
झालेल्या गोष्टीबद्दल स्वत:ला दोष देणे किंवा त्याची खंत बाळगल्यामुळे भूतकाळ बदलत नसतो. चुका  पासून शिका पुन्हा होणार नाहीत असं पहा. 

चिंता किंवा काळजी भविष्यकाळात काय घडेल या विषयी असते. काळजी करण्यापेक्षा योग्य योजना आखून पुढील गोष्टीची काळजी घ्या. चिंतेला कारणच ठेवू नका. 

अज्ञाता ची शक्यता पडताळून पहा. 
अज्ञाता ची भीती खूप वेळा कोणाला काय वाटेल यातून उदभवते, कोण काय म्हणते या पेक्षा आपल्या वागणुकीचे मूल्यमापन करा .
अज्ञात गोष्टीची भीती वाटत असते. निवीन लोकांना भेटा , निवीन गोष्टी शिका. 

परंपरेची बेडी
निवीन मार्ग न शोधता मळलेल्या वाटेने जाण्याचा कल असतो. बदलत्या परिस्थितीत नाविन्याचा शोध घ्या.प्रगतीला बाधक ठरणा-या परंपरेचा त्याग करा. 

जर   खात्री नसेल तर नवीन मार्ग न शोधता, जुनी मळलेली वाट धरून  जबाबदारी टाळली जाते. परंपरा पाळणे सोप्पं असते. विचार करण्याची गरज नसते

समर्थन 
 
योग्य बदल नकरता चुकीचं समर्थन करत राहणे ,  तो तसे करू शकतो तर मी का नाही.  असं समर्थन करणं हे चुकीचं वागणं आहे. हि एक सबब असते. 
 
 चालढकल 

आपण काही करू इच्छितो परंतु सतत पुढे ढकलत राहतो , जसं आज नाही उद्या. काही गोष्टीच महत्त्व जाणून  वेळच्या वेळी करणं योग्य असते.  
 
चालढकल  का करतो. 
 
चालढकल समस्या टाळण्याचा मार्ग आहे असे वाटते. समस्या आपोआप टळेल असे वाटते. 
अपयशाची भीती वाटून काही न करणे. 
पुरेसा वेळ  द्यायला लागू नये. 
स्वावलंबी बना.  
दुस-यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला अशी एक म्हण आहे.  अवलंबून असलेल्यांना दुस-याचा कलाने वागावे लागते. स्वावलंबन म्हणजे आपल्या उक्ती कृतीचा स्वत: मुख्यातार.  

राग 
 
राग हि खिळवून ठेवणारी  नकारात्मक भावना आहे. माणसाच्या निराशेची किंवा नाराजीची ती एक प्रतिक्रिया आहे. बहुतेकदा अपेक्षेच्या विपरीत घडल्यावर हि भावना उदभवते.
आपण रागावतो कारण आपल्या कृतीची जबाबदारी दुस-या वर ढकलण्यासाठी. 
दुस-यांना घाबरवण्यासाठी रागावतो.
 आपल्याला पाहिजे तसे रागावल्या मुळे होत असेल तर रागावतो. 

लेखकाने जीवनाच्या विविध अंगात जाणता ,अजाणता घडणा-या चुकांची चर्चा , कारणमीमांसा केली आहे. योग्य मानसिकतेने ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात.
 

Friday 25 September 2015

दृष्टीकोन

जीवनात आपल्या दृष्टीकोनाला फार महत्त्व आहे. योग्य दृष्टी संधीला सुवर्णसंधीत रुपांतरीत करू शकेल, आणि योग्य दृष्टी चा अभाव संधी गमावून पश्चाताप करण्याची वेळ आणेल. मराठीत एक म्हण आहे "जशी दृष्टी तशी सृष्टी."
सकारात्मक आणि सतत सुधारित दृष्टीकोना मुळे आपलं जीवन उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकू. 

No matter how good and positive your attitude may be, you can improve it.  And when you improve your attitude, your attitude improves you.
 
तुम्हीची वृत्ती , दृष्टीकोन कितीही सकारात्मक चांगला असला तरी त्यात तुम्ही सुधारणा करू शकता. आणि जेव्हा तुम्ही तुमचा  दृष्टीकोन तपासता,सुधारता तेव्हा नवीन दुष्टीकोन तुमचं जीवन उंचावतं.
 
To improve your attitude, you don’t have to deny reality. When you improve your attitude,  it doesn’t mean things will  be perfect.
 
दृष्टीकोन बदलण्यासाठी, वास्तव नाकारू नका. दृष्टीकोन बदलण्याने परिस्थिती आदर्श, चांगली होईल असं नव्हे.
 
What it means is that you’ll be more positive, more effective, and more solidly focused on the best possibilities. What it means is that you’ll live and act from a position of strength.
 
याचा अर्थ, तुम्ही दृष्टी अधिक सकारात्मक , परिणामकारक आणि शक्यते वर भर देणारी असेल. त्याचाच अर्थ तुम्ही जीवनाला समर्थ पणे सामोरे जाल.
 
With an improved attitude, you can still clearly see all the problems. Yet instead of living in fear of them, you’ll choose to be bigger than those problems.
 
नव्या सुधारित दृष्टीकोनाने  तुम्हाला पश्नाची नेमकी जाण होईल. प्रश्नाची भीती बाळगता समर्थ पणे हाताळाल
 
 
Right now, there’s a certain way you feel about life, and a certain way you expect life to be.Just think of what could happen if you made the choice to raise those expectations.
 
आता, जीवनाला एक निश्चित दिशा मिळेल आणि निश्चितपणे एक मार्ग दिसेल , विचार करा,उंचावलेल्या  ध्येयाचा.  
 
 
Whether you have a great attitude or a lousy one, decide today to improve it. For where your attitude goes, your life will quickly follow.
 
तुमचा दृष्टीकोन चांगला असुदे कि वाईट निश्चय करा आजपासून मी माझा दृष्टीकोन सुधारेन! कारण तुमचं जीवन तुमच्या दृष्टीकोना पाठोपाठ धावतं
 
~ Ralph Marston
 
 
 
“If you don’t like something change it; if you can’t change it, change the way you think about it."
तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर बदला. जर बदलू शकत नसाल तर विचार करण्याची  पद्धत बदला
~ Mary Engelbreit
 
http://acumen.co.in/iow/IOW%2051_r2_c7.jpg
cid:image037.png@01D08C07.90299B90
 
 
 

Monday 10 August 2015

जग बदलायची सुरवात आपणा पासून!

घराला आग लागली आहे. 
. . 
घरात माणसं झोपलेली आहेत  आणि त्यांच्या जीवाला धोका आहे. 

घराच्या भोवती   सात शेजारी  आहेत, वृत्तीने हे शेजारी भिन्न भिन्न आहेत. आग विझवून कोण वाचवेल या घरातील रहिवाश्यांना!   

शेजारी क्रमांक १

आपल्याच विचारात गर्क आहे.त्यातच तल्लीन आहे त्यामुळे आगीच भान सुद्धा नाही.  
 
शेजारी क्रमांक २

घराला लागलेली आग दिसत आहे परंतु मला काय त्याचे अश्या  वृत्ती ने पुढे निघून जातो. 
 
शेजारी क्रमांक ३

घराला लागलेली आग पाहतो आणि  मूर्च्छीत  होऊन पडतो.  
 
शेजारी क्रमांक ४ 

घराला लागलेली आग पाहतो आणि प्रथम अग्निशमन दलाला फोन करतो नंतर घरात झोपलेल्या रहिवाश्यांना जागं करण्यासाठी धडपड करतो. 

शेजारी क्रमांक ५ 

घराला लागलेली आग पाहतो आणि कोणी करणार नाही अश्या  धैर्याने घरात प्रवेश करून रहिवाश्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. 
 
शेजारी क्रमांक ६ 

घराला लागलेली आग पाहतो आणि एकंदरीत अंदाज घेतो आपणा साठी काय संधी आहेत. परिस्थितीचा कसा फयदा उठवू शकतो. 

शेजारी क्रमांक ७
  
घराला लागलेली आग पाहतो, काश्याशीच काळजी न करता लपून मजा बघतो. 

 आग लागलेलं घर म्हणजे आपली धरणी माता. 

आणि भूमातेला या संकटा पासून , समस्या पासून , वाचवू शकतील अशी तिची लेकरें  सर्व साधारण पणे वरील सात वृत्तीत  विभागलेली. आपण कोणती वृत्ती जोपासतो आणि त्यापेक्षा उन्नत कसे होता येईल.    
 
वरील  कवितेची मध्यवर्ती कल्पना संध्याच्या काळातील महत्वाच्या प्रश्नाशी निगडीत आहे. आपलं जग वेगवेगळ्या समस्येच्या अग्नीने  वेढलेलं आहे आणि कड्यावरून कोसळण्याच्या स्थितीत आले आहे. आपण प्रत्यके जण काय करू इच्छितो , योग्य आणि आवश्यक कृती करण्यासाठी लोकामध्ये कश्याप्रकारे चेतना निर्माण करू शकू यावर भविष्य अवलंबून आहे. 

अर्थातच आपल्या पैकी खूप कमी जण जगाच्या कल्याणासाठी आपलं बलिदान करतील. आपण सदैव त्यांच्या ऋणात राहू परंतु आपणही शेजारी क्रमांक चार प्रमाणे आग विझवायचं  , लोकांना जागृत करण्याचं काम करायला हवं. 
 
दुर्दैवाने या विशिष्ट  टप्प्यावर मोठी समस्या आहे कि खूप थोडया लोकांना आगीची, समस्येची  जाणीव आहे आणि  ती विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. खूपशा लोकांना आगीची जाणीव नाही किंवा मला काय त्याचे अशी वृत्ती आहे, 

पहिल्या क्रमांकाच्या शेजा-याला घराला आग लागली आहे , हे दिसतच नाही. त्यांना समस्येची जाणीवच नाही. ते अज्ञानात जगत आहेत, आपल्या रोजच्या जगण्यात गुरफटले आहेत.मुळात हि मंडळी चांगली आहे, आपले शेजारी आणि मित्र आहेत. हळुवार पणे त्यांना जागृत करून, शिक्षित करून, समस्येच्या सोडवणुकीच्या कामात सामील करून घ्ययला हवे.
   
दुस-या प्रकारचे शेजारी फारच भयानक आणि सर्वात जास्त डोकेदुखी. देणारे आहेत. या सर्वाना आपण चांगले लोक म्हणून समजतो परंतु चांगली लोकं कायमच योग्य गोष्टी करतात असे नाही. त्यांना समस्येची जाणीव आहे परंतु ते मदत करायचं नाकारतात, ते प्रयत्न करू इच्छित नाहीत. 
ते आळशी आहेत का ? कदाचित काही जण निरुत्साही आहेत , काही जण आत्मकेंद्रित आहेत व आरामदायी जीवन जगण्यात मश्गुल आहेत. त्यांना लोकांच्या सुख दुख:शी देणे घेणे नाही. जग असेच चालणार काही बदलणार नाही अश्या नकारात्मक दृष्टीकोना मुळे प्रयत्न करण्या अगोदरच  हे हरेलेले असतात.   अश्या लोकांकडे आपण दुर्लक्ष करायला हव. अशी लोक कधीच प्रेरित होणार नाहीत अश्यांना सांगायला हवे तुम्ही मदत करू शकत नसाल तर अडथळा आणू नका,  रस्त्यातून दूर व्हा . 
 
तिस-या प्रकारची लोकं चांगली आहेत. त्यांना समस्येचं भान आहे. भीतीनी त्यांची गाळण उडते , प्रसंगाला सामोरे जायचं मनोधैर्य नसते. अश्या लोकांची  भीती दूर करायला हवी आणि चांगल्या  कामा साठी मन तयार करायला हवे. 
 
चार आणि पाच प्रकारची लोकं प्रामाणिकपणे व विवेकबुद्धीने लोकांना मदत करत असतात. आपल्याला अश्या प्रकारच्या जास्त लोकांची आवश्यकता आहे. 
 
सहा आणि सात या प्रकारातील लोकं, चांगल्या कामात आडकाठी आणत असतात. 
 
सहाव्या प्रकारातील लोकं संधिसाधू असतात. आपल्या स्वार्थासाठी परिस्थितीचा उपयोग करून घेतात यातील खूप लोकानी समजूत करून घेतलेली असते कि  दया, करुणा , औदार्य इत्यादी गुण  म्हणजे मूर्खपणा आहे. ते आपल्या विघातक स्वार्थी वागणुकीचे समर्थन करतात ते दुराग्रहाने इतरापेक्षा स्व:ताला मोठे समजतात.
  
 सातव्या प्रकारचे लोकं जाणीवपूर्वक आग लावत असतात, आगीत तेल ओतण्याचे काम हि मंडळी करत असते.अशी लोकं दुष्कृत्या  मध्ये क्रियाशील असतात. त्यांची गणना दुष्टात होते. आपल्या व जगाच्या भल्या साठी अश्या लोकांना प्रेम, दया, सहानभूतीने , समजून घेऊन  त्यांनी पत्करलेल्या मार्गा पासून दूर करायला हवे. 

जग संभ्रम आणि अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे. हि फैललेली आग आपला घास घेईलच परंतु त्याबरोबर  सहाव्या आणि सातव्या प्रकारातील शेजा-याचा हि घास घेईलच. अंतिमता यात कोणाचाही जय नाही. 

एकमेव आशा आहे , ती म्हणजे चार आणि पाच या प्रकारची वृत्ती समाजात मोठ्या प्रमाणावर कश्या प्रकारे  वाढेल  या साठी सर्वांनी प्रयत्न करणे आणि ती सुरवात आपणा पासून करायला हवी. 

जग बदलायची सुरवात आपणा पासून ,
जग बदलेल का ?  नाही माहित  
पण एक नक्कीच,  आपलं जग बदलेलच 
आणि
 जग ही बदलेलं असेल तितक्या प्रमाणात.

 होय ना !


(एका लेखाचं स्वैर भाषांतर , त्रुटी भाषांतराच्या )

Sunday 12 July 2015

वृक्षांचा वाढदिवस व विद्यार्थी कौतुक समारंभ




आदरणीय  सायनेकर सर 


झाडं लावणे या उपक्रमातून मी संजीवनी परिवाराशी जोडला  गेलो असं श्री सायनेकर सरांनी  संजीवानी परिवाराने आयोजित केलेल्या वृक्षांच्या दहाव्या वाढदिवशी सांगितले. एक उपयुक्तवादी दृष्टीकोनातून म्हणजेच पर्यावरण संतुलन साधण्यासाठी झाडं लावतात किंवा सौदर्याच्या दृष्टीकोनातून.  " झाडं लावणे व त्याचं संवर्धन करणे"  या मध्ये माझी व संजीवानीची एक वेगळी भावना आहे, ती म्हणजे वृक्षा प्रती कृतज्ञतेची भावना. झाडा पासून खूप  शिकण्यासारखे आहे. झाडं बहरतात कशी,प्रतिकूल परिस्थितीत वाढतात कशी , झाडावर जो घाव घालतो त्याला ही झाडं सावली देतात , त्यांला  फळं देतात हे सगळं त्यांच्या कडून शिकण्यासारखे आहे. आपल्या आईवडिलांचं   विशेषता वृद्धापकाळात ज्या प्रेमाने, आदराने संगोपन करणं आपलं कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे झाडांच्या बाबतीत आपलं कर्तव्य आहे. झाडांची आणि मुलांची एक प्रकारे तुलना करता येईल लहान रोपाची योग्य काळजी घेतल्या नंतर जसं वृक्षात रुपांतर होतं , तसं संस्कारक्षम मुलांची काळजी आईवडील व समाजाने घ्यायला हवी.


या  वेळी माई च्या हस्ते दहावी, बारावी च्या विद्यार्थ्याचं कौतुक करण्यात आलं. 

सर पुढे म्हणाले , वेगवेगळ्या क्षेत्रा मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांनी फार उत्तम रीतीने आपले विचार मांडले त्याचं मी मना पासून कौतुक करतो. बोलणा-या सगळ्या मुलीच  होत्या. त्याचं सरांनी  विशेष कौतुक केलं व मुलांनी मुली कडून शिकायला हवे असं सांगितलं  ,बेटी पढाव अभियान किती यशस्वी झाले आहे हे ह्यावरून  दिसून येते असं  म्हणाले . 


विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर  म्हणाले There is no short cut to Success.  सचोटी, प्रामाणिकपणा याला कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही. कष्ट करा , जास्तीत जास्त प्रामाणिक रहा. भरपूर पैसे कमवा पण सन्मार्गानेच कमवा. तुमच्या हृदयात विवेकाचा तानपुरा सतत झंकारत ठेवा. डॉक्टर  व्हा , वकील व्हा,इंजिनिअर व्हा पण ते होत असताना जीवनाला  एक परिमाण आहे हे विसरू नका.  ते परिमाण माणुसकीचे आहे , निसर्गप्रमाचे आहे, ते परिमाण माझे आईवडील, माझं कुटुंब , माझा समाज यांच्या साठी मी काहीतरी सातत्याने करण्याचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा शेवट करताना सरांनी उपनिषदातील गुरूचा उपदेश सांगितला, सत्यं वद, वेळ आली तर गप्प बसा परंतु खोटे बोलू नका, धर्म चर , धर्माने चाल , म्हणजे चांगुलपणा , तुम्हाला असलेलं भान सोडू नका. स्वाध्याय करा, तुमच्या क्षेत्रातील ज्ञान अपडेटेड ठेवा. आई, वडील व आचार्यांना देव मानून आदर करणारे तुम्ही व्हा. आम्ह्च्या मध्ये चांगल असेल ते घ्या वाईटाचा त्याग करा. मधमाशी सारखे व्हा सर्व गुण गोळा करा. 
 
दहावी बारावीचा रिझल्ट एक दृष्टीक्षेप 



दहावी बारावीचा टक्केवारी प्रमाणे निकाल 

     
Std90% above80 to 89.99%70 to 79.99 %60 to 69.99 % Less 60%Total
X1434212014103
XII 714333791


दहावीतील प्रथम तीन विद्यार्थी 

कुमारी जुई  मोहन पाटील          बोळींज   ९४.२०%
कुमार हेरंब राजाराम नाईक       करमाळे   ९३.६०%
कुमारी प्रिया मोहन नाईक         वटार       ९३.४०%


जुई मोहन पाटील दहावी ९४.५० %   प्रथम क्रमांक



प्रिया मोहन नाईक दहावी   ९३.४०% तृतीय क्रमांक

 हेरंब राजाराम नाईक       ९३.६०%
 




बारावीतील प्रथम तीन विद्यार्थी 

संपदा सुधीर नाईक     वाघोली      ८९.६९%
प्रणव पांडुरंग वझे       मर्देश         ८६.३०%
नेहा  कैलाश वझे         मर्देश        ८६.१५%
 



संपदा सुधीर नाईक         ८९.६९%





नेहा कैलाश वझे बारावी     ८६.१५% तृतीय क्रमांक
 
 



















सुरवातीला  अरविंद पाटील यांनी वृक्ष वाढदिवस व विद्यार्थी स्नेह संमेलन विषयी संजीवानिची भूमिका  मांडली. आनंद पाटील  यांनी  सुत्रसंचलन व आभार  प्रकट केले.

Saturday 20 June 2015

आनंद एक मनोवृत्ती



आनंदी असणे , आनंदी राहणे आपल्या सर्वांना हवे हवेसे वाटते. आनंदी एक वृत्ती आहे ती आपल्याला मनोवृतीने साध्य आहे.

आनंद आपणा सर्वांना, अवघ्या विश्वाला एकत्र आणते. आनंद मिळवण्यासाठी आपल्या प्रत्येकाची धडपड सुरु असते.  परंतु आजूबाजूच्या आनंदी मंडळी कडे पहिल्या नंतर लक्षात येते कि त्यांनी आनंदी राहण्याचे ठरवले आहे





आनंद हा आपणावर व आपल्या मानसिकतेवर   अवलंबून असतो हे हि मंडळी जाणते,  आणि अश्या  मानसिकते चा स्वीकार आपल्याला आनंदी होण्यास मदत करू शकेल.

हे हि दिवस जातील.
जेव्हा निराशा दाटून आली असेल ,तुमचं जीवन कठीण परिस्थितीतून जात असेल, हृदय विदीर्ण झालं असेल, स्वाभिमान दुखावला असेल , अशी गोंधळाची स्थिती असेल तर तुमच्या मनाला एकच विचार उभारी देईल तो म्हणजे हे हि दिवस जातील, चांगले दिवस येतील.
हे हि दिवस जातील
हा विचार,   परिस्थिती क्षणभंगुर आहे त्यात बदल होणार आहे  असे सांगतो ,आशावाद जागृत करतो , शहाणं करून सागतो  कि जीवन एक सतत वाहणारा प्रवाह आहे. चिरस्थायी असे काही नाही.आणि हे दु:ख आणि सुख या दोघांना लागू आहे.


आपण एकटे नाही आहोत
हे सगळे माझ्याच वाट्याला का? असं आपल्या पैकी प्रत्येकाला दु:खाच्या प्रसंगी, कठीण परिस्थितीत वाटत असते,. म्हणून मनात विचार करा तुम्ही एकटे नाहीत. कितीही अंधार दाटून आला तरी  काळरात्र संपणार आहे, उष:काल होणार आहे.

         
चांगुलपणावर विश्वास ठेवा.
लोक  वाईट आहेत असा विचार करणे सोपं आहे.आपलच मन नकारात्मक विचारचक्रात गुंतून जाते. इतरांच्या चांगुलपणा वर विश्वास असू द्या.आपापसात सौदार्ह जपा.


चांगली बाजू बघा.
आपला दृष्टीकोन बदलला तर आपले जग हि बदलू शकते. कसं जगायचे ? हसत,  हसत कि रडत,कुथत.
दृष्टीकोन बदला, चांगली बाजू तिथेच आहे. 
नकारात्मक विचारांचा त्याग करा. आनंद तुमच्याच ठायी आहे. त्याला मोकळी वाट करून द्या.
हसा थोडं आता  ! हसणे छान असते.


श्वासोश्वास संथ ठेवा.
एकाच वेळी एका गोष्टी वर लक्ष ठेवण्याचं व प्रत्येक क्षण तन्मयतेने जगण्याचं  सतत स्मरण ठेवले पाहिजे. जाणीव पूर्वक श्वास वर लक्ष ठेवण्याने चिंता व गडबडीला दूर ठेवू शकाल.व दिवस ध्यान मग्न होईल.




  ( एका छोट्या लेखाचं भाषातर  त्रुटी माझ्या )

Wednesday 17 June 2015

काव्य आणि संवाद कौशल्य

नाना पाटेकर म्हणजे अभिनय क्षेत्रातील एक उच्चस्थ शिखर  त्यातही संवाद कौशल्य म्हणजे  परमोच्च  बिंदू. अनेक चित्रपटातील संवाद त्या  मुळेच  अजरामर झाले आहेत. क्रांतिवीर , यशवंत, परिंदा,वजूद , थोडासा रुमानी हो जाय  अश्या अनेक चित्रपटाची यादी  देता येईल. अमोल पालेकरच्या थोडासा रुमानी हो जाय मधील नानांचा  हा संवाद म्हणजे सुंदर काव्य आणि संवाद कौशल्य याचा सुरेख मिलाफ.

हां मेरे दोस्त
वही बारिश
वही बारिश जो आसमान से आती है
बूंदों मैं गाती है
पहाड़ों से फिसलती है
नदियों मैं चलती है
नहरों मैं मचलती है
कुंए पोखर से मिलती है
खप्रेलो पर गिरती है
गलियों मैं फिरती है
मोड़ पर संभालती है
फिर आगे निकलती है
वही बारिश

                   ये बारिश अक्सर गीली होती है
                   इसे पानी भी कहते हैं
                   उर्दू में आप
                   मराठी में पानी
                   तमिळ में कन्नी
                   कन्नड़ में नीर
                   बंगला में… जोल केह्ते हैं
                   संस्‍कृत में जिसे वारि नीर जीवन पै अमृत पै अम्बु भी केह्ते हैं
                   ग्रीक में इसे aqua pura
                   अंग्रेजी में इसे water
                   फ्रेंच में औ’
                   और केमिस्ट्री में H2O केह्ते हैं

ये पानी आंखों से ढलता है तो आंसू कहलता है
लेकिन चेहरे पर चढ़ जाये तो रुबाब बन जाता है
हां…कोई शर्म से पानी पानी हो जाता है
और कभी कभी यह पानी सरकारी फाइलों में अपने कुंए समेत चोरी हो जाता है

                पानी तो पानी है पानी जिन्दगानी है
                इसलिए जब रूह की नदी सूखी हो
                और मन का हिरण प्यासा हो
                दीमाग में लगी हो आग
                और प्यार की घागर खाली हो

तब मैं….हमेशा
ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूं
मेरी मानिए तो ये बारिश खरीदिये
सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश
सिर्फ 5 हज़ार रुपये में
इस्से कम में दे कोई तो चोर की सज़ा वो  मेरी
आपकी जूती सिर पर मेरी
मेरी बारिश खरीदये
सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश


दुसरी अशीच एक कविता आहे वजूद मधील 


कैसे बताऊं मैं तुम्हे?
मेरे लिए तुम कौन हो?, कैसे बताऊं?
कैसे बताऊं मैं तुम्हे
     तुम धड़कनों का गीत हो, जीवन का तुम संगीत हो
     तुम ज़िंदगी तुम बंदगी, तुम रोशनी तुम ताज़गी
     तुम हैर ख़ुशी तुम प्यार हो, तुम प्रीत हो मनमीत हो....!
 
आँखों में तुम यादों में तुम, साँसों में तुम आहों में तुम
नींदों में तुम ख्वाबों में तुम
तुम हो मेरी हर बात में, तुम हो मेरे दिन रात में
तुम सुबाह में तुम शाम में, तुम सोच में तुम काम में......!
 
मेरे लिए पाना भी तुम, मेरे लिए खोना भी तुम
मेरे लिए हासना भी तुम, मेरे लिए रोना भी तुम
और जागना सोना भी तुम जाऊं कहीं देखूं कहीं
तुम हो वहाँ तुम हो वहीं कैसे बताऊं मैं तुम्हे?, तुम बीन तो मैं कुछ भी नहीं
कैसे बताऊं मैं तुम्हे, मेरे लिए तुम कौन हो?
 
ये जो तुम्हारा रूप है ये ज़िंदगी की धूप है
चंदन से तराशा है बदन, बहती है जिस में एक अगन
ये शोखियाँ ये मस्तियाँ, तुमको हवाओं से मिली
ज़ूल्फें घटाओं से मिली होंठों में कालियाँ खिल गयी आँखों को झीले मिल गयी
चेहरे में सिमटी चाँदनी, आवाज़ में है रागिनी
शीशे के जैसा अंग है फूलों के जैसा रंग है
नदियों के जैसी चाल है क्या हुस्न है क्या हाल है
ये जिस्म की रंगीनियाँ जैसे हज़ारों तितलियाँ
बाहों की ये गोलाईयाँ, आँचल में ये पार्चछाइयाँ
ये नगरियाँ है ख्वाब की, कैसे बताऊं मैं तुम्हे, हालत दिल-ए-बेताब की
कैसे बताऊं मैं तुम्हे, मेरे लिए तुम कौन हो? कैसे बताऊं, कैसे बताऊं
कैसे बताऊं मैं तुम्हे?
 
मेरे लिए तुम धरम हो, मेरे लिए ईमान हो
तुम ही इबादत हो मेरी, तुम ही तो चाहत हो मेरी
तुम ही मेरा अरमान हो ताकता हूँ मैं हर पल जिससे, तुम ही तो वो तस्वीर हो
तुम ही मेरी तक़दीर हो, तुम ही सीतारा हो मेरा तुम ही नज़ारा हो मेरा
यू ध्यान में मेरे हो तुम, जैसे मुझे घेरे हो तुम
पूरब में तुम पश्चिम में तुम, उतर में तुम दक्षिण में तुम
सारे मेरे जीवन में तुम, हर पल में तुम हर छिन में तुम
मेरे लिए रास्ता भी तुम, मेरे लिए मंज़िल भी तुम
मेरे लिए सागर भी तुम, मेरे लिए साहिल भी तुम
मैं देखता बस तुमको हो, मैं सोचता बस तुमको हूँ
मैं जानता बस तुमको हूँ, मैं मानता बस तुमको हूँ
 
तुम ही मेरी पहचान हो कैसे बताऊं मैं तुम्हे देवी हो तुम मेरे लिए मेरे लिए भगवान
हो कैसे बताऊं मैं तुम्हे, मेरे लिए तुम कौन हो?
कैसे.............?

 
 
 
तिसरी  दामोदर कोरे ची कविता  त्यांनी एका कार्यक्रमात म्हटलेली 
 

वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे

         कधी बाजारी कधी नदीच्या काठी
         राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
         हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
         कधी रमत गमत वा कधी भरारी थेट

लावून अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा

        गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
        झुळ्झुळ झर्‍याची पसरावी चौफेर
        शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
        खुलवीत मखमली तरंग जावे गात

वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानी सांगावे हितगूज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी

          दिनभरी राबुनी दबला दिसता कोणी
          टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
          स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
          घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा. 


आपण सर्वांनी या कविता ऐकल्या असतीलच कविता वाचून पुन्हा एकदा युट्युब वर बघा,  ऐकणे एक  मैफिल होऊन जाईल.