Tuesday 2 August 2022

तत्त्वचिंतक वैज्ञानिक डॉ. जेम्स लव्हलॉक

 

रसायनशास्त्र, आरोग्यविज्ञान व पर्यावरणशास्त्र क्षेत्रांत अनन्यसाधारण योगदान देत जगाची समज वाढवणारे  तत्त्वचिंतक वैज्ञानिक डॉ. जेम्स लव्हलॉक यांनी २६ जुलैला त्यांच्या जन्मदिवशी, वयाची १०३ वर्षे पूर्ण करून जगाचा निरोप घेतला. ‘विज्ञान क्षेत्रातील तत्त्वज्ञ’ असे त्यांचे वर्णन करता येईल. लोकसत्ता (३१/७/२०२२)  रविवार विशेष मधील अतुल देऊळगावकर यांच्या लेखातील काही ठळक विचार.  (लेख मुळातूनच वाचायला हवा.)



‘‘तुम्हाला सत्य कधीही गवसत नाही. प्रत्येक वेळी तुम्ही सत्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकता. आपण प्रयत्नांची पुनरावृत्ती करत आहोत, हेही तुमच्या ध्यानात येत नाही.’’    

‘‘संपूर्ण जग हे पर्यावरणीय संकटांच्या खाईत असेल व त्यामुळे मानवजातीचे सर्व आडाखे व गणिते चुकतील,’’ असं लव्हलॉक यांनी  सांगून टाकलं होतं. त्यांना  वातावरणातील कर्ब वायूंचं वाढतं प्रमाण आणि त्याचे दुष्परिणाम याचा अंदाज आला होता.  तेव्हापासूनच त्यांना ‘विलक्षण द्रष्टा वैज्ञानिक’ आणि ‘पर्यावरणीय विचारवंत’ अशी ख्याती लाभली.  ‘‘जगाला तापमानवाढ ही संकल्पना लव्हलॉक यांच्यामुळेच समजली. त्यांच्यामुळे पृथ्वी आणि पर्यावरण यांचे व्यापक आकलन होऊ शकलं.’’ 

‘‘संपूर्ण पृथ्वी हीच एक स्वयं नियंत्रण (सेल्फ रेग्युलेशन) करू शकणारी सजीव संस्था (लिव्हिंग ऑर्गेनिझम) आहे. त्यामध्ये भौतिक, रासायनिक, जैविक आणि मानव हे घटक आहेत. या सर्वामधील जटिल आंतरक्रिया व त्यांना मिळणारा प्रतिसाद यातून पृथ्वीवरील समतोल साधला जातो.’’ अशी मांडणी केली. पृथ्वीकडे समग्र दृष्टीने पाहावे. ती एक एकसंध सजीव संघटन आहे, असा आपला समज व्यापक व स्पष्ट व्हावा आणि पृथ्वीवर होणारे बदल लक्षात यावेत, यासाठी ते गाया हे रूपक वापरतात.  

आपल्या खूप जवळचा  धोका ओळखून वागण्याचं शहाणपण जगानं कधी दाखवलं आहे? हवामान बदलाच्या महासंकटाच्या तावडीत असूनही आपलं वर्तन बदलत नाही. वाळवंटीकरण सोपे व वननिर्माण महाकठीण आहे. महामूर्ख मानवजातीला हवामान बदल रोखणं शक्य नाही. ‘‘पर्यावरणाचं स्वरूप जागतिक असून त्याचं आव्हान मात्र सामाजिक व राजकीय आहे. आपला समाज काळानुरूप सुसंस्कृत व जबाबदार होत नसल्यामुळे संपूर्ण पृथ्वी धोक्यात आली आहे.’’  

 

‘‘पर्यावरण जपण्यासाठी अणुऊर्जा व जनुकीय स्थानांतर तंत्रज्ञान यांची गरज आहे. हे झापडबंद व सोवळय़ातील पर्यावरणवाद्यांच्या लक्षात येत नाही. पर्यावरणीय विचारांचा पंथ वा धर्म होत आहे.’’

 

 ‘‘आपण पृथ्वीला संपवण्याआधी ती आपल्याला संपवेल. हवामान बदल आणि निसर्ग विनाश या दोन भिन्न समस्या आहेत, असाच विचार पुढे करत राहिलो तर आपलं जगणं अशक्य आहे.’’  

 

मानवतावाद , लोकशाही इत्यादी गोष्टीचा सद्यस्थितीत खूप गाजावाजा करतात लव्हलॉक म्हणतात 

‘‘हवामान बदलासारखी युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी लोकशाहीची प्रक्रिया ही काही काळ स्थगित ठेवावी लागेल.’