Tuesday, 11 November 2025

नेक्सस : माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास

 

नेक्सस : माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास — अश्मयुगापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत. (शोध प्रकाशाचा प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा घेतलेले पुस्तक)

यूव्हाल नोआ हरारी (Yuval Noah Harari) इस्त्रायली (Israeli) इतिहासकार, लेखक, विचारवंत, हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेम प्राध्यापक म्हणून काम, मानवजातीचा इतिहास, लष्करी तंत्रज्ञान, माहिती आणि चेतना हे अभ्यास आणि संशोधना चे विषय. त्यांची अनेक पुस्तक जगभर प्रसिध्द आहेत  त्यातील काही महत्वाची पुस्तकं

  • सेपियन्स मानवजातीचा संक्षिप्त इतिहास
  •  भविष्यातील मानवजातीचा प्रवास 
  • २१व्या शतकातील २१ धडे   
  • नेक्सस : माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास — अश्मयुगापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत.

नेक्सस : माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास  हे त्यांच नवं पुस्तक या पुस्तकात ते काही प्रश्न उपस्थित करतात.

मानव जातीला होमो सेपियन्स  (Home Sapiens) म्हणजे शहाणी मानवजात म्हटलं जाते. ते विचारतात आपण या प्रमाणे वागतो का?

पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते काही प्रश्न आपल्या पुढे ठेवतात.

 

आपण इतके बुद्धिमान आहोत, तरीही इतके आत्मघाती का आहोत?”
आपण विज्ञान, औद्योगिक क्रांती, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या अद्भुत गोष्टी निर्माण केल्या; तरीही आपण पर्यावरण नष्ट करतो, युद्धे करतो, तंत्रज्ञानाचा गैरवापर करतो — हे का?

आपल्याकडे इतकी माहिती असूनही आपण इतके गोंधळलेले का आहोत?”
इंटरनेट युगात माहिती विपुल आहे, पण सत्य आणि असत्य यातील फरक ओळखण्याची क्षमता हरवते आहे.  माहितीचा अतिरेक हा ज्ञान नव्हे, तर भ्रम निर्माण करतो. गोंधळवून टाकतो.

आपण इतके जोडले गेलो आहोत, तरीही इतके एकाकी का आहोत?”
सोशल नेटवर्क्स, डिजिटल संपर्क असूनही मानवी मन भावनिकदृष्ट्या अधिक एकटे पडले आहे. म्हणजेच “connection” वाढली, पण “understanding” कमी झाली.

आपण जगावर इतके नियंत्रण ठेवतो, तरीही स्वतःवर नियंत्रण का ठेवू शकत नाही?”
मानवाने अणुशक्ती, जैवतंत्रज्ञान, AI यांवर प्रभुत्व मिळवले.  पण राग, लोभ, मत्सर, स्वार्थ या मानसिक शक्तींवर विजय मिळवू शकला नाही.

 

त्यांनी उत्पन्न केलेले प्रश्न भिडतात ना ! त्यांच्या इतर पुस्तकाविषयी पुन्हाकधीतरी.