Monday, 13 February 2023

साधं सरळ जीवन!

 

आपण रोज बघतो, जग फार गुंतागुंतीचं आहे.  जीवन काही साधं, सरळ राहिलं नाही , रोजची धाकाधाकी , गडबड, गोधळ , तोंडमिळवणी करताना उडणारी तारांबळ हे सर्व पाहता जीवन साधं सरळ कसं जगता येईल? हेच सांगतात शुनम्यो मसुनो प्रख्यात बौध्द संन्याशी आपल्या  “झेन -साधं सरळ जीवन जगण्याची कला” (ZEN- The Art of Simple Living) या प्रसिध्द पुस्तकातून. एका वाक्यात ते सारांश सागतात. “ थोडसं थांबून विचार करा आणि रोजच्या सवयीत, दृष्टीकोनात बदल करून प्रसन्नता अनुभवा. “

रोजच्या आयुष्यातील छोट्या बदलातून प्रसन्नतेची अनुभूती येऊ शकते. त्याचं बरोबर आंतरिक शांती आणि स्थैर्याचा अनुभव येऊ शकतो. त्यासाठी झेन ज्ञानप्रणालीवर आधारित शंभर दिवसासाठी, छोटेछोटे शंभर नियम पाळण्याचा सल्ला देतात.

पुस्तकात चार विभाग केले आहेत,

१)     ‘स्व’ ला  उर्जाभारीत (Energetic) करण्याचे मार्ग : आपल्या सवयीत सूक्ष्म बदल करण्याचा प्रयत्न करा असं सुचवले आहे. छोट्या छोट्या सवयी बदला. जश्या की

·       पंधरा मिनिटं लवकर उठा,

·       तुमचं टेबल स्वच्छ ठेवा,

·       पादत्राणे काढाल तेव्हा ती रांगेत ठेवा,

·       खाण्याची आबाळ करू नका ,

·       खात असताना प्रत्येक घासानंतर क्षणभर थांबा,

·       तुमचे आवडते शब्द कोणते हे शोधा,

·       शाकाहारी खाण्याचे लाभ लक्षात ठेवा,

·       दीर्घ श्वास घ्या ,

·       सावकाश श्वासोश्वास करा,

·       हात जोडा.

रोजच्या जीवनात अश्या सवयी जपा ज्यामुळे जगण्यात उत्साह संचारेल. प्रत्येक सवयीचा अनुभव घ्या. शाकाहारी खाण्याचे लाभ सांगताना ते  म्हणतात. अन्नामुळे मन आणि शरीर निर्मितीत हातभार लागतो. निव्वळ शाकाहारी भोजन घेण्याने तुमचं मन शांत आणि स्थिर होतं. मांसाहार संपूर्ण त्याग करणे तुम्हाला कदाचित शक्य होणार नाही परंतु एखादा दिवस निव्वळ शाकाहारावर राहून पहा अनुभव घ्या !!

हात जोडा ह्या सवयी बद्दल सांगतात. उजवा तळहात तुमच्या व्यतिरिक्त इतर सर्वांचे प्रतिनिधित्व करतो. डावा तळहात तुमचं प्रतिनिधित्व करतो. हे दोन्ही तळहात एकत्र आणून आपण ते एकवटतो.  त्यातून विनम्रता प्रकट होते, या कृतीतून आदर दाखवला जातो. आपल्या मनात कृतज्ञतेची भावना जागते.  अश्या छोट्या छोट्या ३० सवयी आपल्या जीवनात उत्साह संचारण्यात मदत करतील.

२)     आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण करण्याचे मार्ग : दृष्टी तसी सृष्टी म्हटलं जाते. आपला दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करा. जग बदलेल. 

·       आपल्या कामाचा आनंद घ्या ,

·       इतरांना दोष देऊ नका,

·       स्वतः चा आब राखा,

·       स्वतःचे डोके वापरून विचार करा,

·       मत नक्की करू नका,

·       बदलाची दखल घ्या,

·       स्वतःवर विश्वास ठेवा,

·       सक्रिय व्हा.

स्वतः वर विश्वास ठेवा सांगताना म्हणतात आपल्या सा-यांच्यात क्षमता आहेत. या बाहेर कशा आणायच्या इतकाच प्रश्न असतो. स्वतःकडून स्वर्वोत्तम ते द्या.

अश्या प्रकारचे ३० दृष्टीकोन सुचवले आहेत ज्यातून आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण होईल.

३)     गोंधळ आणि चिंता दूर सारण्याचे मार्ग : या विभागात  इतरांशी वागण्याच्या पद्धतीती बदल करण्याचे २० मार्ग सुचवले आहेत.

·       दुस-यांच्या गुणावर लक्ष केंद्रित करा ,

·       जे जसं आहे तसं बघा ,

·       हानी किवा लाभ या स्वरुपात विचार करू नका,

·       कोणाला तरी आनंदी करा ,

·       तुमच्या समोर येणा-या प्रत्येक व्यक्तीला दाद द्या.

यातील एक मार्ग म्हणजे जीवनातील  तीन विषं दूर करा. हाव, क्रोध आणि अज्ञान ही तीन विषं आहेत. हाव कधीच पूर्ण होत नाही , क्रोधामुळे लहानशा गोष्टीपायी संताप होतो. अज्ञान ही तर मूर्खताच असते. तारतम्य आणि ज्ञान आपल्या कडे नसते. जीवनात शांती हवी असेल तर या तिन्ही गोष्टी टाळा.

४)     दिवस सर्वोत्तम करण्याचे मार्ग : दिवस सर्वोत्तम करण्यासाठी प्रत्येक क्षण लक्षपूर्वक जगा. त्यासाठी २० मार्ग सांगितले आहेत.

·       चांगलं आणि वाईट अशी विभागणी करू नका ,

·       प्रत्येक दिवसाप्रती कृतज्ञ रहा,

·       नेहमी केवळ एकच मार्ग असतो असं नाही,

·       ऋतुमधील बदलाची दखल घ्या,

·       जीवन सार्थकी लावा.

·        

बुद्धत्व शिकवतं की , जीवनकालाच्या लांबी बरून आयुष्याचं मूल्यं ठरत नसते. आपण जीवन कसं व्यतीत करतो हे महत्वाचं आहे.

जगावं कसं याचं मनन करत असताना मरावं कसं यांचही मनन आपण करायला हवं. “डोळ्याची पापणी लवते न लवते तोच “ हा क्षण वाया न जाऊ देण्यासाठी आपण सर्वोत्तम प्रयत्न करायला हवेत.

रोजचं जीवन अधिक प्रसन्न,समृध्द, परिणामकारक करण्यासाठी पुस्तक वाचायला हवं. जीवनाचं अंग बनवायला हवं.

 

Sunday, 1 January 2023

मी कोण ?

 निर्वाण षटक  आदी शंकराचार्य

श्री शंकराचार्य गुरूच्या शोधात भ्रमण करत असताना एका महर्षि शी भेट झाली महर्षींनी शंकराला विचारले तू कोण आहेस शंकरांनी  सहा श्लोकात उत्तर दिले,म्हणून षटक, मी ची सर्वव्यापक   व्याख्या  निर्वाणषटकम.

मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं
  श्रोत्रजिह्वे   घ्राणनेत्रे 
  व्योम भूमिर्न तेजो  वायुः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥१॥

 

शंकर सांगतात मी म्हणजे,

मन (Memory) नाही , बुद्धी (intelligent) नाही , अहंकार (Ego) नाही , चित्त (intelligence) नाही,

मी कान, जीभ, नाक, डोळे  नाही  म्हणजेच ज्ञानेद्रीय म्हणजे मी नव्हे,

मी आकाश, भूमी,अग्नी , वायू  नाही  म्हणजेच पंचमहाभूते म्हणजे मी नव्हे,

आपण पाहिलं तर लक्षात येते ज्ञानेंद्रियात  स्पर्श आणि महाभूतात पाण्याचा उल्लेख नाही. जेव्हा चार ज्ञानेंद्रिय व चार महाभूतांशी जीवाला  वेगळ करतात, तेव्हा स्पर्श आणि पाणी त्यात अंतर्भूत होते.

चौथ्या ओळीत शंकराचार्य स्वतः ची म्हणजेच जीवाची व्याख्या करतात,

मी आंतरिक आनंदाचे मूर्त रूप आहे मी शिव आहे, मी शिव आहे.

 

  प्राणसंज्ञो  वै पञ्चवायुः
 वा सप्तधातुः  वा पञ्चकोशः 
 वाक्पाणिपादं  चोपस्थपायु
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥२॥

 

मी श्वासोश्वास(प्राण) नाही किवा पंचवायू नाही.

(शरीरात पाचवायू  प्राण,अपान,उदान व्यान, समान वेगवेगळी कार्य करत असतात ते म्हणजे मी नव्हे. प्राण वायू - श्वसन क्रिया, विचार प्रक्रिया  अपान वायू - उत्सर्जन क्रिया  मल,मुत्र घाम . व्यान वायू  – रक्ताभिसरण आणि शरीरातील अवयवातील एकता.  उदान वायू -  उत्साह आणि हलकेफुलके पण, मृत्यू समयी भौतिक शरीरातून सूक्ष्म शरीर सोडणारी शक्ती.  समान वायू – पचनक्रिया आणि  शरीर धारणा , शरीरातील उष्णता नियंत्रित करणे )  .

मी सप्त धातू नाही, नाही मी पंचकोश ,

(शरीर सात धातूचे आणि पाच कोष मिळून बनले आहे असं आयुर्वेद सांगतो. सात घटक – रस ,रक्त , मास ,मेद, अस्थी, मज्जा ,शुक्र . मानवी शरीर पाच सूक्ष्म स्तरांनी बनलेले आहे. अन्नमय कोष- जे अन्न आपण खातो त्यांनी जे शरीर बनते ते अन्नमय कोष.  (bag of food)

प्राणमय कोष-  पाच वायुनी बनते, शरीराला शक्ती देणारं  उर्जाचक्र.  

मनोमय कोष-  ज्ञानेद्रीयांनी साठवलेली स्मृती.

विज्ञानमय कोष-  बुद्धी आणि ज्ञानेंद्रियानी बनतो.

आनंदमय कोष.  सर्व कर्माचं गाठोडं.)

मी पाच कर्मेद्रिय नाही ( वाणी, हात, पाय, पायु (गुद) आणि उपस्थ),   

मी आंतरिक आनंदाचे मूर्त रूप आहे मी शिव आहे, मी शिव आहे.

 

 मे द्वेषरागौ  मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः 
 धर्मो  चार्थो  कामो  मोक्षः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥३॥

 

माझ्यात तिरस्कार आणि आसक्ती किंवा लोभ आणि मोह  नाही,

मला गर्व नाही, मला मत्सर, हेवा नाही,

धर्म (Sustain), अर्थ (Wealth), काम (Desire), मोक्ष(liberation)  प्राप्त करण्याची इच्छा नाही. (चार पुरुषार्थ )

मी आंतरिक आनंदाचे मूर्त रूप आहे मी शिव आहे, मी शिव आहे.

 

 पुण्यं  पापं  सौख्यं  दुःखं
 मन्त्रो  तीर्थं  वेदा  यज्ञाः 
अहं भोजनं नैव भोज्यं  भोक्ता
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥४॥

 

शंकराचार्य सांगतात,

मी पुण्य , पाप, सुख , दुख: पासून मुक्त आहे,

मंत्र , तीर्थयात्रा , वेदाभ्यास ,यज्ञ या साधना मधून मला काही साध्य करायचं नाही,

भोजनम, भोज्य, भोक्ता .ना मी विषय , ना मी वस्तू ना मी उपभोक्ता आहे,

मी आंतरिक आनंदाचे मूर्त रूप आहे मी शिव आहे, मी शिव आहे.

 

 मृत्युर्न शङ्का  मे जातिभेदः
पिता नैव मे नैव माता  जन्मः 
 बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥५॥

 

जन्मापासून मृत्यू पर्यंत वेगवेगळ्या नातेसाबंधात जीव अडकला जोतो शंकराचार्य सांगतात,

मला मृत्यूच्या स्वरूपाविषयी शंका नाही म्हणून मी जन्माच्या आधारे कोणतेही भेदभाव करत नाही,

मला वडील नाहीत , मला आई नाही मला जन्म नाही,

मला भाऊ, मित्र, गुरु, शिष्य नाहीत,

मी आंतरिक आनंदाचे मूर्त रूप आहे मी शिव आहे, मी शिव आहे.

 

अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् 
 चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेयः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥६॥

 

मी परिवर्तनहीन आणि निराकार आहे,

मी सर्व इंद्रियांवर राज्य करतो, आणि व्यापतो,

मी  आसक्त आणि अलिप्तत किंवा मुक्त नाही,

मी आंतरिक आनंदाचे मूर्त रूप आहे मी शिव आहे, मी शिव आहे.