Monday 11 March 2013

फ्लॅमिंगो फेस्टिवल


फ्लॅमिंगो फेस्टिवल





बीएनएचएसने  (Bombay Natural History Society) ९ मार्च २०१३ रोजी  शिवडी जेट्टीवर फ्लॅमिंगो फेस्टिवल चे आयोजन केले होते. पक्षी निरीक्षण व  निसर्गाजवळ घेऊन जाणारा उपक्रम.  लोकांना पक्ष्यांच्या सवयी, त्यांच वास्तव्य व त्यांना संभवणारे धोके याची माहिती देण्यासाठी  बीएनएचएसची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणी व स्पॉटिंग स्कोपच्या सहाय्याने पक्ष्यांना बघणे हा  एक आनंद होता. या ठिकाणी रोहितवरचे छायाचित्र व माहिती प्रदर्शन आणि चेहरा रंगवणे, पक्षी टॅटू व ‘आपल्या पंखांची लांबी मोजा’ असे लहान मुलांकरता उपक्रम होते.

   
 फ्लॅमिंगो या पक्ष्याचे रोहित हे आपल्याकडचे  नाव आहे. अग्निपंखी हे दुसरे नाव. फ्लॅमिंगो पक्ष्यांची भारतातील सर्वात मोठी जननभूमी कच्छचे रण आहे. हिवाळ्यात ते कच्छ येथून शिवडीला स्थलांतर करतात. पंधरा ते सोळा हजार इतक्या मोठ्या  संख्येने येतात.   आपल्याकडे  ग्रेटर फ्लेमिंगो आणि लेसर फ्लेमिंगो असे दोन प्रकार आढळतात.




 
ग्रेटर फ्लेमिंगोंची उंची 125 ते 145 सेंमी असते. ते पांढरे शुभ्र असतात. त्यांची मान उंच असून भडक लाल रंगांचे आखूड पाय असतात. चोच गुलाबी रंगांची, तर डोळे पिवळसर असतात.   हे किडे-कीटक व पाणवनस्पती खातात.









लेसर फ्लेमिंगोंची उंची 80 ते 90 सें.मी असते. ते पांढऱ्या-तांबूस रंगाचे असतात. यांची मान आखूड असून पाय उंच असतात. त्यांची चोच जाड व काळसर रंगाची आणि डोळे लालभडक असतात. ते फक्त पाणवनस्पतींवर जगतात.









फ्लेमिंगों सामाजिक पक्षी असून एकत्र राहतात. फ्लेमिंगों तसी ३१-३७ मैल वेगाने उडू शकतात, सुरवातीला रनअप घेतात. फ्लेमिंगों  एकत्र उडताना  विलोभनीय दिसतात.

उडण्यासाठी स्टार्ट                    



   
 टेक ऑफ
  
हवेत झेप 

No comments:

Post a Comment