निर्मळ-वसई मार्गावर गिरिज येथे एक टेकडी आहे. पूर्वी येथे राजाचा किल्ला होता त्यानंतर पुर्तोगीझानी आपले लष्करठाणे केले होते. चिमाजी आप्पांनी वसई च्या लढाई च्या वेळी हा गड ताब्यात घेऊन लढाईचे मुख्य केंद्र बनविले. या गाडावरून वसई किल्ल्यात जाण्या साठी भुयार होते.
![]() |
हि-या सारखे चमकणारे गारांचे तुकडे |
चिमाजी आप्पा पेशव्याचे वजीर त्यावरून वजीरगड असे नाव. या टेकडी वर गारेचे खडक होते/ आहेत ते हि-या सारखे चमकत म्हणून हिरा
वृक्षांचा समावेश आहे.
गडावरून सर्वदूर परिसर न्हाहाळता येतो.पायथ्याशी असलेल्या घरा पासून ते अरबी समुंद्रापर्यंत चा पट्टा नजरे च्या टप्प्यात येतो. छोटी छोटी भाताची खाचरं त्यांनी मांडलेल्या हिरव्या रंगांच्या वेगवेगळ्या छटांच प्रदर्शन, ताडा माडा ची झाडे आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जातात.
![]() |
वजीर गडावरून अरबी समुंद्रापर्यंतचा विवं (View) |
![]() |
विविध रानफुले |
डोंगरी परीसरात विविध रानफुले आढळून येतात. दक्षिणे कडील पाय-या वर गोगलगाईचे प्राबल्य हि जाणवते. जैविक विविधतेनी हा परिसर नटलेले आहे.
गर्दीपासून दूर व निसर्गाची आवड असणा-याना नक्कीच आवडेल असे ठिकाण
Very informative. Such wonderful place so near but not yet visited. Now plan to visit in near future.
ReplyDelete