Friday 20 March 2015

आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान


अंतरीचा दिवा हे श्री संदीपकुमार साळुंखे याचे पुस्तक वाचनात आले. पुस्तक आवडल्याचं सागण्यासाठी फोन केला असता, जळगाव येथील दीपस्तंभ फौंडेशननी राबवलेल्या आत्मविश्वास आणि प्रेरणा या अभियानाचा  विषय निघाला. जळगावातील विध्यार्थ्यांना झालेल्या फायद्याचा उलेख केला आणि संजीवनीला विध्यार्थ्यासाठी अभियान घेण्याचे सुचविले. पुस्तकातील  दोन प्रकरणाची एक पुस्तिका  बनवून  संजीवनी टीमला वाचयला दिली.  टीमने  चर्चा  केली व  आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान  आपल्या  विध्यार्थ्यासाठी  घ्यायचे ठरविले.  दरम्यानच्या काळात दीपस्तंभ च्या  श्री युजुवेंद्र महाजन सरांशी  बोलून  अभियान विषयी माहिती घेतली. अभियान कसं घ्यायला पाहिजे  या विषयी सरांनी मार्गदर्शन केलं. 
संजीवनी टीमने अभियानाचे  स्वरूप व नियोजनाचा आराखडा तयार केला. विध्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व स्पर्धा परीक्षेची मानसिकता तयार व्हावी या साठी एक लेखी परीक्षा घ्यावयाची त्या अंतर्गत विध्यार्थ्यानी दोन पुस्तके वाचायची
 १) संदीपकुमार साळुंखे याचं धडपडणा-या तरुणाईसाठी
 २) राजेश पाटील याचं ताई मी कलेक्टर व्हयनू!.
 विध्यार्थ्याचे दोन गट करण्यात आले पहिला गट  ८वी  ते ११वी   दुसरा गट १२ वी  पुढील विद्यार्थी. या गटा
साठी   २० मार्कचे चालू घडामोडीवर प्रश्न. परीक्षेचं क्षेत्र संजीवनीला नवीन असल्याकारणाने  शिक्षकांचं सहकार्य  घ्यायचे  ठरविण्यात आले.
अभियानातील तीन मुख्य घटक म्हणजे विद्यार्थी,पालक व शिक्षक वर्ग. विध्यार्थ्यांना दोन महिने पुस्तकं वाचण्यासाठी देण्याचे ठरले व परीक्षा  दिनांक २१ डिसेंबर  २०१४ रोजी ठेरली. पालकांना व शिक्षकांना सहभागी करून घेण्यासाठी  पालक शिक्षक  मेळावा   दिनांक २३ नोव्हेबर २०१४ रोजी वाघोली शनिमंदिर येथे घेण्यात  आला.  
 पालकांना  व  शिक्षकांना  अभियानात  त्यांच्या कडून काय अपेक्षित आहे व या कसे सहभागी होता येईल याविषयी माहिती देण्यात आली. प्रतिसाद उत्तम होता.
 शिक्षकांनी प्रश्नपत्रिका सेट करण्यापासून निकालपत्र तयार करण्याची जबाबदारी घेतली. व सर्वानाच दिलासा दिला कि अभियान आपण चांगल्या पैकी यशस्वी करू.
टीम संजीवानिनी गाव निहाय जबाबदारी वाटून घेतली व संध्याकाळी ७ नंतर गावोगावी भेटी  देऊन  विध्यार्थाना   अभियानाची माहिती व नावं नोंदवून घेण्यासाठी  भेटीचे वेळा पत्रक ठरवून  अमलबजावणी  केली.
विद्यार्थी वर्गांनी छान प्रतिसाद दिला. 
 
आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान २०१४
गट  क्र. १गट क्र. २  एकूण
नाव नोंदणी 307305612
दिनांक २१ डिसेंबर २०१४ रोजी वेळापत्रका प्रमाणे परीक्षा घेण्यात आली.  परीक्षेत प्रत्येक्षाला  २५३ विद्यार्थी बसले. 
     

आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान २०१४
गट  क्र. १गट क्र. २  एकूण
परीक्षेला बसले132121253
    
परीक्षा घेण्याची व निकाल पत्र तयार करण्याची शिक्षक मंडळीने कौश्यल्यपूर्ण रीतीने पूर्ण केली. दुपारी २ वाजता  आलेली मंडळीनी विध्यार्थ्यांना ची वर्गात बसण्याची व्यवस्था करणे, प्रश्नपत्रिका,उत्तरपत्रिका वाटणे, पर्यवेक्षका चे काम करणे, परीक्षा संपल्या नंतर उत्तरपत्रिका तपासणे, निकालपत्र तयार करणे इत्यादी कामं लीलया केली. ही सर्व कामगिरी संपल्या नंतरच घरी गेली. कामाचा थकवा नव्हे  तर प्रसन्नता आली अशी सर्व शिक्षक मंडळीची प्रतिक्रिया होती. त्यांना सलाम.
परीक्षेचा ग्रेड प्रमाणे निकाल खालील प्रमाणे
आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान २०१४
गट  क्र. १गट क्र. २  एकूण
परीक्षेला बसले132121253
ग्रेड प्रमाणे उत्तीर्ण विध्यार्थी 
A+617
A1129
B+2833
3022
C+3012
278
 एकूण132121
अभियान २०१४ चा सांगता समारभ :सांगता, गौरव समारंभात श्री सायनेकर सर व श्री संदीपकुमार साळुंखे सरांनी यावे म्हणून विशेष प्रयत्न होते.दोन्ही सरांनी मान्य हि केलं होतं परंतु साळुंखे सरांना कामाच्या व्यग्रते मुळे येणे शक्य झाले नाही. परंतु त्यांनी संजीवनी च्या या उपक्रमा साठी विडीओ बनवून पाठवला .   माननीय  सायनेकर सर सांगता समारंभाला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दोन्ही गटातील पहिल्या तीन विध्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. विध्यार्थ्यासाठी श्री साळुंखे सरांनी पाठवलेला मार्गदर्शक  विडीओ व्याख्यान दाखवण्यात आलं




विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सायनेकर  सरांनी स्व: ओळखण्यासाठी SWOT अनालिसिस चा कसा उपयोग  होतो हे विशद केले  व शेवट उपनिषदातील गुरुकुलात विध्यार्थाना केलेल्या उपदेशाने केला सत्यं  वद , धर्म चर ,स्वाध्यायान्मा प्रमद:  म्हणजेच नेहमी खरे बोलावे,धर्माने म्हणजेच नियमाने आचरण करावे आणि स्वाध्याय करण्यास चुकू नका, कंटाळा करू नका. 

गौरव करण्यात आलेले विद्यार्थी
गट क्रमांक १ 
 प्रथम क्रमांकरुचितामहेशजोशी भुईगाव 
तन्वी नितीनपाटीलनवाळे 
व्दितीय क्रमांक पूर्णिमासुभाषनाईकभुईगाव 
तृतीय क्रमांक ऋतुजाप्रशांतवझेमर्देस
चैतालीअविनाशम्हात्रेवाघोली 

चैताली म्हात्रे सरांच्या हस्ते बक्षीस स्विकारताना

ऋतुजा वझे  सरांच्या हस्ते बक्षीस स्विकारताना



पूर्णिमा नाईक सरांच्या हस्ते बक्षीस स्विकारताना



तन्वी पाटील सरांच्या हस्ते बक्षीस स्विकारताना

रुचिता जोशी सरांच्या हस्ते बक्षीस स्विकारताना






गट क्रमांक  २ 
प्रथम क्रमांकहिमांशूअनिलनाईकउमराळे 
व्दितीय क्रमांक मृगेषाकिशोरनाईकवाघोली  
निखिलभालचंद्रवझे मर्देस
तृतीय क्रमांक शर्वरीअरुणनाईकउमराळे 


कु. शर्वरी नाईक हिचं कौतुक करताना सर


निखिलची बहिण बक्षीस घेताना

मृगेषाची बहिण बक्षीस घेताना















 

हिमांशू नाईक प्रथम पारितोषक स्विकारताना
 

 विद्यार्थी कौतुका बरोबरच प्राध्यापक श्री नरेश नाईक  यांना मुंबई विद्यापीठ मधून सामवेदी बोलीभाषा या प्रबंधाला डॉक्टरेट  पदवी मिळाल्याबद्दल श्री सायनेकर सर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 


प्राध्यापक श्री नरेश नाईक 


No comments:

Post a Comment