Thursday 7 May 2015

पूर्वांचल बदलत आहे " यु इंडियन ते वुई इंडियन "

 
पूर्वी  ६० च्या दशकात  यु इंडियन म्हणणारे  पूर्वांचल वासी आता वुई इंडियन असे म्हणत आहेत. आता चीनचा कावा त्यांच्या लक्षात येत आहे. खूप काम करण्याची आवश्यता आहे. मुख्य धारेशी जोडण्याचे काम अधिक जोमाने करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन श्री सुनील देवधरजी यांनी संजीवनी व्याख्यानमालेत ईशान्य भारत समस्या आणि समाधान या विषयावर बोलताना केले. आपल्या देशांत सुर्यनारायणा चे पहिले किरण अरुणाचल येथील डांग या गावी पडते तिथून त्याचा भारतात प्रवास सुरु होतो. पुर्वांचल ची सात हि राज्ये निसर्ग विविधतेनी नटलेली आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने अतिसुंदर प्रदेश आहे, परंतु दुर्लक्षित राहिलेलला आहे. नैसर्गिक साधन सामुग्रीची भरपूर देणगी या प्रदेशाला मिळाली आहे. मेघालयात देशातील सर्वात मोठा युरेनियम साठा आहे परंतु पूर्वांचल अंधारात आहे. राज्यातील एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात जाणारे महामार्ग नाहीत. आसाम मध्ये खनिज तेलाचे साठे आहेत परंतु शुद्धीकरण करणारे प्रकल्प बिहार मध्ये त्यामुळे सुधारणा पासून वंचित राहिलेल्या या भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पूर्वांचल साठी विविध योजनावर काम कारण-या होम इंडियाची माहिती दिली व आपण हि घरबसल्या पूर्वांचल साठी कश्या प्रकारे काम करू शकतो याची माहिती दिली. शिक्षणा साठी पुणे , मुंबई कलकत्ता इत्यादी शहरात येणा-या विध्यार्थ्यांशी मैत्री वाढवून, संपर्क ठेवून त्यांच्याशी   सांस्कृतिक  बंध ठेवून राष्ट्रभावना दृढ करू शकू.



 

व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी प्रा. नरेश नाईक होते.











प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख अरविंद पाटील यांनी केली स्वागतगीत सौ रीमा नाईक व अनंत नाईक यांनी सादर केले. 

No comments:

Post a Comment