Thursday 21 July 2016

स्वतःला जाणून घ्या.

 यशस्वी होण्यासाठी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं व्यक्तिमत्त्व. आपल्याला काय करायला आवडतं ,
कोणत्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो.  कोणत्या  गोष्टीची भीती वाटते.  स्वतःला जाणून घ्या.जाणून घेण्यासाठी कॉलेजच्या उपक्रमात सहभावी व्हा!  कॉलेज जीवनाचा , स्वतःला समजण्यासाठी , घडवण्यासाठी उपयॊग करा.  वक्तिमत्त्व म्हणजे ओळख असते असे प्रतिपादन श्री अरुण नाईक यांनी विद्यार्थी कौतुक समारंभात केले ते पुढे म्हणाले . जसे धोनी म्हटलं की कॅप्टन कुल , कोहली म्हटलं की अग्रेसिव्ह अशी ओळख  आपल्या समोर येते.

आपण प्रत्येक गोष्टी तून काहीतरी शिकत असतो, खेळातून ही आपण शिकत असतो. मांजराच्या पिल्लाचा स्वतःची शेपटी पकडायचा खेळ म्हणजे  पिल्लाचा  अस्थिर गोष्टी वर एकाग्र होण्याचा सराव असतो  त्यातूनच ते उंदीर पकडण्याचं कौशल्य शिकत असतं. सुरवातीला लोहार, सुतार , कुंभार , गवंडी , गवळी  इत्यादी पारंपरिक व्यवसाय होते त्याचे शिक्षण  आईवडील , कुटुंब , नातेवाईक , एका पिढी कडून दुस-या पिढीला मिळत असे. पुढे व्यवसायाचं स्वरूप बदललं, शिक्षण देणारी व्यवस्था बदलली , शाळा ,आयटीआय ,कॉलेजस आली.  शिक्षण व व्यवसाय कसे एकमेकाला पूरक असतात हे त्यांनी शाळा आणि कारखाना यातील कार्यप्रणालीची साम्यस्थळं दाखवून विशद केलं. वेळेवर शाळा भरणे/ सुटणे  यावरून वेळेचं व्यवस्थापन शिकवलं जातं.१० वी , १२ वी पर्यंत अभ्यासक्रमाची पुस्तकं (Textbooks)  असतात पुढच्या शिक्षणात विषयाचं एकच एक पुस्तक असं नसते तुम्हाला अनेक पुस्तकातून विषय समजून घ्यायचा असतो. कोणताही विषय समजण्यासाठी भाषा चांगली यायला हवी. भाषेसाठी वाचन आवश्यक. स्वतः:हून अभ्यास करता येणे ही पुढची पायरी आहे. त्यासाठी वाचन आणि वाचलेलं किंवा आपल्याला सुचलेली कल्पना योग्य पद्धतीनं मांडता येणे याला संवाद म्हणतात. आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. 
आपल्याकडे व्यवसायाच्या  जाती झाल्या  , कोणताच व्यवसाय कमी दर्जाचा नसतो. तुमची आवड काय आहे ते पहा. मुद्दा पटवून देताना त्यांनी सलूनचा व्यवसाय करण-या   पुण्यातील डॉक्टरांच उदाहरण दिलं . 
 
व्यवसायात अनेक संधी आहेत. हे संधीच युग आहे. लोकांच्या गरजा ओळखायला शिका, आपल्यात योग्य ते बदल करा. नवीन गोष्टी जाणून घ्या!  शेवटी त्यांनी विद्यार्थी , पालकांच्या प्रश्नाला उत्तरं दिली 

पाहुण्यानी  संजीवनीच्या वाचन अभियानाचं कौतुक केल.


कौतुक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जैमुनी पतपेढीचे अध्यक्ष श्री वसंत नाईक होते. पाहुण्याची ओळख , प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राजू नाईक यांनी केले, सौ सपना पाटील हिने सुत्रसंचलन केलं





 

 कु  सेजल नाईक    Bcom मुंबई विद्यापीठात तिसरी 
ज्येष्ठ विद्यार्थी  अनुभव कथन करताना

कु.मनाली  म्हात्रे  CA 









































कु  निखित नाईक     Bpharma 
भाग्यश्री नाईक  Master in  French 











दहावी    प्रथम  क्रमांक  विद्यार्थी



प्रणिती प्रशांत नाईक ओंडाणी ९५%



अनुश्री  संजय नाईक वाघोली ९५%


तेजस अजित नाईक  वटार ९५%



दहावी द्वितीय  क्रमांक  विद्यार्थी

सिद्धी संदीप म्हात्रे भुईगाव ९४.५०%  







































दहावी  तृतीय   क्रमांक  विद्यार्थी




जान्हवी  विश्वास नाईक वटार ९४%
 बारावी  विद्यार्थी

रुपल  यशवंत नाईक XII प्रथम  ८८. ३१%

रुचिता महेश जोशी  XII  द्वितीय  ८५.६९%


विशाखा  मकरंद नाईक XII  तृतीय  ८३.२३% 















No comments:

Post a Comment