Tuesday 2 May 2017

सर्जिकल स्ट्राईक: तथ्य की मिथ्य

 सर्जिकल स्ट्राईक    १०१ टक्के  खरा - कर्नल शैलेश रायकर 

सर्जिकल स्ट्राईक हे तथ्य आहे त्यात मिथ्य बिलकुल नाही. त्या भोवती मिथकं तयार झाली आहेत.  DGMO नी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली हीच एक मोठी खात्री आहे.  लष्कराने पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्याची ही पहिलीच वेळ आहे. असं प्रतिपादन निवृत्त कर्नल शैलेश रायकर यांनी संजीवनी व्याख्यानमालेत सर्जिकल स्ट्राईक तथ्य की मिथ्य या विषयावर बोलताना केलं.   दहशतवादी केंद्र चालविण्याची कबुली दिल्या सारखं होईल म्हणून पाकिस्तान हे नाकारतं आहेत.  
सुरुवात करताना त्यांनी सांगितलं की सर्जिकल हा वैद्यकीय शब्द आहे. जगातील कोणत्याही लष्कराच्या पाठयपुस्तकात सर्जिकल स्ट्राईक असा शब्द नाही. एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कमीत कमी वेळेत व कमीत कमी संसाधन वापरून केलेला हल्ला म्हणजे सर्जिकल स्ट्राईक.




रुडयार्ड किपलींगने सागिंतलेल्या  सहा प्रश्नांची चौकशी आपल्याला सत्य उलगडायला मदत करेल. 
 ते सहा प्रश्न म्हणजे  कोणी ? कधी ? कुठे? काय ? कसं ? आणि का ?    चार प्रश्नाची उत्तर आपल्या सर्वांना माहित आहेत  भारतीय सेनेने २९ सप्टेंबर २०१६ ला kel व hotspring ह्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय सेनेने LOC पलीकडील पाक सरहद्दीत घुसून ७ दहशतवादी केंद्र उद्वस्त केली.योजना अंमलात आणताना काय काय आणि कशी कशी काळजी घेतली जाते हे त्यांनी उदाहरणं देऊन स्पष्ट केलं. का केला गेला सर्जिकल स्ट्राईक तर सरकारनी ठरवलं की दहशतवादी कारवाई थांबण्यासाठी आम्ही अशी कृती करू शकतो आणि त्यांनी आर्मीला तसे आदेश देऊन अंमलात आणले. या अगोदरही सर्जिकल स्ट्राईक झाले आहेत परंतु त्याला प्रसिद्धी दिली गेली नाही उदा. भारतीय सेनेनी २०१५ साली भारत ब्रह्मदेश सरहद्दी वर सर्जिकल स्ट्राईक केला होता.
युद्ध, हल्ला हा राजकीय उद्दिष्टा साठी केला जातो. (War is instrument of politics).या वेळी सरकारनी ठरवलं की दहशतवादी कारवाई थांबण्यासाठी आम्ही अशी कृती करू शकतो आणि त्यांनी आर्मीला तसे आदेश देऊन योजना अंमलात आणली. 
सेना अश्या योजने वर सतत काम करत असते युद्धच्या नऊ तत्त्वाप्रमाणे सेनेचे काम सतत सुरु असते. जशे शत्रू प्रदेशाची माहिती नकाशे , नेमकं उद्दिष्ट, नेमकी कृती  ,नेमकं ठिकाण , यशस्वी होण्याची शक्यता, जाण्या येण्याचा मार्ग, , घ्यावयाची काळजी, बरोबर घ्यावयाचे सामान ,टीमची निवड , प्रत्येक सैनिकांची  अपेक्षित  काम , पर्यायी योजना इत्यादी. 






या वेळी आपले कमांडो चालत गेले आणि धावत आले. निवडलेल्या सातही दहशतवादी केंद्रात काम फत्ते केलं, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या सुरत  मोहिमेत महाराजांनी निवडलेल्या मार्गाचं उदाहरण देऊन मार्ग निवडण्याचं महत्त्व समजावून सांगितलं तर नेमलेली कामगिरी करून तुरंत माघारी फिरण्याचं तत्त्व समजावण्यासाठी  त्यांनी अफजल खानाच्या वधाची कहाणी सांगितली, अफजलखानाचा वध केल्यानंतर महाराजा ताबडतोब गडावर परतले, (principle of Engage disengage ) त्याच्या सहाय्यकांनी मागे राहून अफजलखानाचं मुंडकं आणलं त्याला शिक्षा करण्यात आली कारण त्यांनी दिलेली कामगिरी चोख केली नाही, महाराजांच्या बरोबर राहून त्यांची काळजी घ्यायची ही त्याची कामगिरी होती. 

 अश्या अभ्यास केलेल्या  योजना सेने कडे  तयारच  असतात.  या वेळी सरकारनी स्पष्ट आदेश दिले. सरकारच्या भूमिका खालील गोष्टीवरून ठरत असते, भौगोलिक स्थिती , अर्थकारण, पायाभूत सुविधा , राजकीय स्थिती, जनमत  , आंतरराष्ट्रीय संबंध , आणि सेनेची तयारी. 

सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी वरील सर्व गोष्टी सरकारच्या बाजूला होत्या पंतप्रधान मोदींनी जगभर फिरून आंतरराष्ट्रीय संबंध जपण्यावर भर दिला होता. पाकिस्तान पेक्षा सर्व क्षेत्रात आपण वरचढ आहोत. भारतीय जनमानसात पाकिस्तानला धडा शिकवावा अशी भावना होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अश्या कृती साठी आपली सेना सुसज्ज होती. त्यामुळेच कोणतीही हानी न होता भारताने आपली ताकद दाखवून दिली. या कृतीने प्रश्न सुटणार नाही परंतु भारत अश्या प्रकारे उत्तर देईल हा संदेश नक्कीच गेला. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळींज एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री दामोदर देशमुख होते, पाहुण्याची ओळख व प्रास्ताविक चंद्रकांत नाईक यांनी केलं. ईशस्तवन कु. जुईली पाटील हिने सादर केलं तर कार्यक्रमाचं सुत्रसंचलन सौ नेहा पाटील हिने केलं. 








व्याख्यानाच्या शेवटी कर्नल रायकरांनी श्रोत्यांचा प्रश्नाला उत्तर दिली. 
 

No comments:

Post a Comment