Monday 18 March 2024

जिमी कार्टरच्या जीवनातील काही धडे !

अमेरिकेचे एकोणचाळीसावे अध्यक्ष  जिमी कार्टरच्या वयाच्या नव्वदव्या वर्षी चिंतनातून लिहिलेलं  पुस्तकं म्हणजे पूर्ण जीवन. दीर्घ अनुभव संपन्न आयुष्यात शिकलेले काही धडे आपल्या समोर मांडले आहेत. त्यातून काही प्रेरणा मिळेल.

 

.  आपले कुटुंब आणि मित्र  आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे लोक आहेत. त्यांचा आदर करा.

. प्रत्येकाशी आदराने वागा. त्यांची सामाजिक स्थिती किंवा पार्श्वभूमी काहीही असो,  नम्र आणि दयाळू व्हा.  

.   महत्वाकांक्षी ध्येये  ठेवा. ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा आणि चिकाटी ठेवा.

.   कठीण परिस्थितीत  नेहमी योग्य गोष्ट करा. प्रामाणिकता  आणि नैतिकता याची कास धरा..

. समाजाचं देणं परत द्या. इतरांना मदत करण्यासाठी तुमचा वेळ आणि संसाधने वापरा.

. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा.  

. अपयशला  घाबरू नका. अपयश हा जीवनाचा एक भाग आहे. तुमच्या चुकांमधून शिका आणि पुढे जा.

. क्षमाशील व्हा. स्वतःला आणि इतरांच्या चुकांसाठी क्षमा करा.

. वर्तमान क्षणात जगा. भूतकाळात रमू  नका किंवा भविष्याची चिंता करू नका.

१०. जीवनाचा आनंद घ्या. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी शोधा आणि त्यांच्यासाठी वेळ काढा.

११. नवीन अनुभवांसाठी खुले रहा. नवीन गोष्टी वापरून पहा आणि   आरामदायी /सुरक्षिततेच्या  बाहेर पडा.

१२. जिज्ञासू बना. प्रश्न विचारा आणि  शिका.

१३. धैर्यवान व्हा. तुमचा विश्वास असलेल्या अप्रिय गोष्टींसाठी उभे रहा.

१४.  स्वतःसाठी आणि जगाच्या चांगल्या भविष्यावर विश्वास ठेवा. आशावादी व्हा.

१५.  तुमच्या सभोवतालच्या जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी तुमची प्रतिभा आणि क्षमता वापरा. जगात चांगले बदल घडवा.

 आशा आहे की हे धडे तुम्हाला पूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रेरित करतील.  

(स्वैर भाषांतर,अर्थातच त्रुटी माझ्या.)


No comments:

Post a Comment