Wednesday, 12 November 2025

शोध प्रकाशयात्रेचा

 शोध प्रकाशयात्रेचा

काष्ठं, संगमरवर, तार शिल्पंकृतींचे प्रदर्शन, नुकतंच संपन्न झालं.

जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई
४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२५
सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वसई, वाघोली येथील प्रसिद्ध शिल्पकार श्री सचिन चौधरी यांच जहांगीर आर्ट गॅलरीतलं सहावं एकल प्रदर्शन.
शोध प्रकाशयात्रेचा , प्रवास कलेचा, कृतज्ञतेचे भावनेने केलाला अंतरीच्या दिव्याचा शोध , शोध आत्मप्रकाशचा. परम पूजनीय पांडुरंगशास्त्रीजिंच्या शिकवणीचा प्रभाव दर्शविणार प्रदर्शन. त्यांनी आपल्या सर्जनशील प्रवासाला प्रेरणा देणा-या काही श्लोकाचा उल्लेख केला आहे. त्याचा भावार्थ,
ईश्वर पूर्ण आहे विश्व पूर्ण आहे त्यातून निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट पूर्ण आहे,
भारत भूमीत मनुष्य जन्म मिळणे दुर्लभ आहे,
मनुष्याच्या बांधनाचे आणि मुक्तीचे कारण मन आहे,
जन्म,मृत्यू, जरा व्याधी याचे सतत चिंतन कर,
मन, बुध्दी आपले मित्र आणि शत्रू आहेत, विवेक बुध्दीने स्वत:चा उद्धार करा,
भगवान आपल्या हृदयात वास करीत आहे,
तुम्ही अमृताचे पुत्र आहात.
मुग्धपणे दर्शकाला प्रकाशित करणा-या कलाकृती.






सर्जनशील शिल्पविष्कारा मागील शिल्पकार सचिन चौधरी यांनी नमूद केलेले विचार आणि प्रेरणा

 ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥  ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥


हे (ईश्वर) पूर्ण आहे
, ते (विश्व) सुद्धा पूर्ण आहे. त्या पूर्णातून हे पूर्ण प्रकट झाले. त्या पूर्णातून पूर्ण काढले तरी उरते तेही पूर्णच राहते."

जन्तूनां नरजन्म दुर्लभमिदं तत्रापि पुंसत्त्वं ततः विप्रत्वं तस्माद्वेदपाठश्रुतमहो धर्मोऽपि तस्मात्परः ।

आत्मानात्मविवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितिः मुक्तिर्नो शतकोटिजन्मसुकृतैः पुण्यैर्विना लभ्यते ॥  (विवेकचूडामणि २–३)

सर्व जंतूंपैकी (जीवांत) मनुष्यजन्म अत्यंत दुर्लभ आहे. त्या मनुष्यजन्मातही —पुरुषत्व,त्याहूनही ब्राह्मणत्व,त्याहूनही वेदाध्ययन आणि धर्माचरण,आणि त्याहून सर्वोच्च म्हणजे आत्म–अनात्म विवेक, स्वानुभव, आणि ब्रह्मात्‍मभावात स्थिती ही सर्व मिळविणे शतकोटी जन्मांच्या पुण्यकर्मांशिवाय अशक्य आहे.

दुर्लभं भारतजन्मं, तस्माद्विप्रत्वं, तस्माद्वेदज्ञानम्। तस्मादात्मानुभूतीः, तस्मान्मोक्षः॥

भारतभूमीत जन्म मिळणेहे अत्यंत दुर्लभ आहे, कारण ही धर्म, योग, तप, ज्ञान आणि मुक्तीची भूमी आहे. त्यात ब्राह्मणत्व (सत्कर्म, सद्विवेक, सदाचार युक्त जीवन) मिळणे त्याहून श्रेष्ठ. त्याहूनही उच्च म्हणजे वेदज्ञान आणि आत्मानुभव प्राप्त करणे. आणि अखेरीस त्या ज्ञानातून मोक्ष (मुक्ती) मिळविणे — हेच अंतिम ध्येय.

सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर् ज्ञानमपोहनं च । वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यः वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥

मी (भगवान) सर्वांच्या हृदयात वास करणारा आहे. माझ्याकडूनच स्मरण (स्मृती), ज्ञान, आणि विस्मरण (अपोहन) हे सर्व उत्पन्न होते. सर्व वेदांद्वारे मीच जाणण्यास पात्र आहे; मीच वेदांचा कर्ता आणि जाणणारा (वेदविद्) आहे.

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥ (भगवद्गीता ६.५)

मनुष्याने स्वतःच्या आत्म्याने (बुद्धी, विवेकशक्तीने  स्वतःचाच उद्धार करावा; स्वतःचं पतन (खाली ओढणे) करू नये. कारण स्वतःच आत्मा (मन, बुद्धी) हा स्वतःचाच मित्र देखील आहे, आणि स्वतःचाच शत्रू सुद्धा आहे.

ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ (भगवद्गीता ४.११)

हे पार्था (अर्जुना),जे जसे माझ्या शरण येतात, त्यांना मी तसाच प्रतिसाद देतो. सर्व प्रकारचे मनुष्य माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात.

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् । आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च । जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥

जन्म, मृत्यू, जरा (वृद्धापकाळ) आणि व्याधी (रोग) यांमधील दुःखरूप दोषांचे सतत चिंतन करणे, म्हणजेच या दुःखांच्या स्वरूपाचे ज्ञान ठेवणे ही देखील ज्ञानाची (आध्यात्मिक विवेकाची) एक लक्षण आहे.

श्रुण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः ।   (श्वेताश्वतर उपनिषद् – अध्याय २, मंत्र ५)

हे सर्व अमृताचे पुत्रांनो, हे विश्वातील जीवांनो — ऐका!” तुम्ही मर्त्य नाही, तुम्ही अमृतस्वरूप (अविनाशी आत्मा) आहात.

मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः। बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम्॥

मनुष्यांच्या बंधन आणि मुक्तीचे कारण मनच आहे. जेव्हा मन विषयांमध्ये (इंद्रियसुखात) आसक्त होते, तेव्हा ते बंधनाचे कारण बनते; आणि जेव्हा ते विषयांपासून विरक्त होते, तेव्हा ते मुक्तीचे कारण बनते.

 







No comments:

Post a Comment