Tuesday, 22 July 2014

अर्थसंकल्प - अनेक अर्थ


अर्थसंकल्प वरील विवेचनाला सुरवात करताना  हिंदीतील  कविता
जीत की खातीर बस जुनून चाहिये
                 "जिसमे उबाल हो ऐसा खुन चाहिऐ"
ये आसमा भी आयेगा जमी पर   
             "बस इरादो मे जीत की गूँज चाहिये"  चा उलेख करून म्हटले कि या संकल्पा मध्ये जिंकण्याची उर्मी आहे का  हे आपण शोधणार आहोत.


अत्यंत समर्थ सरकारचा अत्यंत सावध अर्थसंकल्प व संरक्षण ह्या विषयाची व्याख्या आणि व्याप्ती वाढवणारा हा अर्थसंकल्प आहे. असे प्रतिपादन श्रीयुत चंद्रशेखर टिळक यांनी शनिमंदिर वाघोली येथे संजीवनी परिवाराच्या "अर्थसंकल्प अनेक अर्थ"  या कार्यक्रमात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री यशवंत पाटील होते. ते पुढे म्हणाले कि अच्छे दिन आने वाले हैं असे म्हटलंय तर  कुठे आहेत अच्छे दिन  असे विचारतात त्याचं उत्तर असे कि अच्छे दिन आयेगे असे म्हटलंय पण कब आयेगे हे म्हटलं नाही त्यासाठी वेळ द्यावा लागेल. 
 अर्थसंकल्प हे आर्थिक राजकारणाचं किवा राजकीय अर्थकारणाचं माध्यम आहे. सरकार बदलणे हि राजकीय प्रक्रिया आहे  परंतु  अर्थकारण हे राजकारणाच्या पलीकडे  आहे.  मणिपूरच्या क्रीडा विद्यापीठाच्या तरतुद म्हणजे  प्रामाणिक प्रयत्नांना मनापासून   दिलेली दाद  आणि पोचपावती  आहे असे म्हणाले. किसान पत्र ,  स्माल सेविंग , पी पी एफ , यातील तरतुदी  व त्याचा दीर्घकालीन परिणाम सोदाहरण  उकलुन  दाखविला  शेवट करताना त्यांनी सांगितले कि दीर्घकालीन दृष्टीकोनातून विचार केला तर आशा  ठेवायला  नक्की  वाव आहे असा अर्थसंकल्प. 
सुरवातील कमलाकर पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले तर आनंद पाटील यांनी सुत्रसंचलन  व आभार मानले.    




Monday, 14 July 2014

वृक्षा मध्ये मी पिंपळ



  माझी विभूती पिंपळ । म्हणोनि बोलिला गोपाळ ।


हिरा डोंगरीवरील हा महावृक्ष
  
भगवंतांनी गीते मध्ये सांगितले आहे कि सर्व वृक्षा मध्ये मी पिंपळ   आहे. पिंपळ हि माझी एक विभूती आहे. गौतम बुद्धांना या वृक्षाखाली बोध (ज्ञानप्राप्ती) झाला  म्हणून  याला  बोधिवृक्ष  हि म्हणतात .   वैज्ञानिक दृष्ट्या हि पिंपळाची विशेषता आहे.  पिंपळ हा  २४ तास ऑक्सिजन प्रसवणारा  वृक्ष आहे. त्यामुळेच या वृक्षाखाली प्रसन्न  ,उत्साहवर्धक वातावरण असते.  पानाचे देठ लांब असल्याकारणाने हवे मुळे पानांचा टाळ्या वाजवण्यासारखा आवाज होतो ती  सळसळ  चैतन्य निर्माण करते . पिंपळाच्या पानाची जाळी  हे   पिंपळाच्या पानेचे एक वैशिष्ट, विध्यार्थी दशेत हि पाने पुस्तकात  ठेवून ,पानाची पूर्ण एकसंध जाळी व्हावी म्हणून प्रयत्न असायचे. 


लाल ,पोपटी हिरवा ते हिरवा , घन हिरवा   


पानझड ते लाललूसलुसित कोवळी पाने 

 पिंपळाला नाश न पावणारा वृक्ष असे हि म्हणतात (अश्वस्त ).    पानझड ते नवीन पालवी खूप वेगात येत असते त्या वेळी पानाची स्थित्यंतरे त्याचे  रंग खूपच  लोभनीय असतात.



                                                                                         

लाल ,पोपटी हिरवा ते हिरवा रंगांची किमया 

 


इवलसे रोप ते महावृक्ष





गया येथील बोधिवृक्ष (१७ जुलै २००९)
 
आपल्याकडे आढळणारी भेंड (भेंडीचे झाड) हि पिंपळ वर्गातील असून त्याला   परोसा पिंपळ  म्हणतात. 
भेंडीची फुले फळं आणि पाने (पिंपळाच्या पानाशी   साम्य आढळतंय?)
 
 
 
आणि हो शेवटच्या प्रवासात भेंडीचे फोकच साथ देतात