Thursday 11 February 2016

मुंबई पुणे मुंबई , जीवाची ( दोन ) मुंबई !

 


कालच पेन ड्राईव्ह वर मुंबई पुणे मुंबई हा सिनेमा मिळाला.  पहिला भाग पहिला होता. हा दुसरा भाग हा सुध्दा एकदा पाहून झाला होता  मी पुन्हा पुन्हा सिनेमा का पाहत होतो. मला कळत नव्हते. एका वाक्यात सिनेमची कथा  सांगायची  झाली  तर ह्या दोन्ही भागात, मुलगा, मुलगी पाहणे ते लग्न हा प्रवास दाखवला आहे. ह्यात पुन्हा पुन्हा बघण्या सारखं  काय आहे. काल  समाजातील ती बातमी कळली आणि मला कळले कि मला हा सिनेमा का आवडतो. चित्रपट पाहताना  गेल्या दोन तीन वर्षातील आपल्या कडील लग्न जुळण्याच्या , मोडण्याच्या घटना  डोळ्यापुढे तरळून गेल्या. कुठं तरी तरुण मुलांच्या मनस्थिती वर, मनातील घालमेली वर प्रकाश टाकणारा  चित्रपट असं वाटतं. ह्यातील काही संवादच आपल्याला  विचार करायला लावणारे. 
 
 
"पूर्वी १०० लग्न झाली तर १० किंवा २० मोडायची आता १०० तील १०-२० चं टिकतात. ८० मोडतात, कारण आपण नातं उलगडूनच देत नाही". 
 
पूर्वी  लग्न  घरून ठरवूनच (Arrange Marriage ) होत असत. त्यातील बहुसंख्य चांगला संसार करत. काय कारण असावी. त्या पिढीत समजूतदार पणा होता कि एकमेकाला साभाळून घेण्याची कला अवगत होती कि घेतलेले निर्णय निभावून न्यायाची वृत्ती होती. कि  Actual Love Begin at Fifty वर विश्वास होता. 
 
आताशा उच्च शिक्षीत  मंडळी मध्ये लग्न मोडण्याचे प्रकार वाढले आहेत. आई वडिलांचे लाड , त्यांना देण्यात येणारी मोकळीक /स्वातंत्र्य. यांचे तर दुष्परिणाम नव्हेत. मुले शिकली  परंतु निर्णयक्षम झाली का? हा संशोधनाचा विषय आहे.  . 
  
"तू पाऊस मी छत्री 
तू कन्फ्युज मी खात्री "
 
वेळेत नकार किंवा होकार देता येत नाही अशी कन्फ्युज पिढी आहे संध्याची.
 
"वेळेत नकार दिला नाहीस ना आणि नंतर रीअलाईज झालं ना तर मात्र माती होईल" चर्चा होईल म्हणून नाही, पण कसं वागू नये म्हणून लोकांनी आपलं उदाहरण देऊ नये इतकचं."
 
जीवनाकडून फारच अपेक्षा आहेत. पण स्वत:ला काय आवडते हे ठरुवू शकत नाहीत आणि घेतलेल्या निर्णयाची बांधिलकी जुमानत नाहीत. काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचं आहे. सर्वांची त्यांच्या बेस्ट फ्रेंड शी लग्न होतीलच  असं नाही परंतु ज्याच्याशी होईल त्याच्याशी बेस्ट फ्रेंडशिप करायला हवी.  
 

तरुण मंडळी कशीही वागली, जे घडतंय , त्यातून चांगला मार्ग कसा काढता येईल  हे सुसंस्कृत  व्यक्ती , कुटुंब ,सामाजिक संस्था ,समाज म्हणून पहावं लागेलच ना राव ?

नटखट पिढी गलत बर्ताव करे इसमे सबकी हार है
किसी ओर को दोष न देगें , हम सब जिम्मेदार है

काय राव ! "आल का लक्षात मी काय म्हणतोय ते ?"
 
तूर्तास, ह्या मुलांनी एक काळजी जरूर घ्ययला हवी 
 
"   होणा-या लग्नाचा किंवा मोडणा-या लग्नाचा राडा होऊ ध्यायचा नाही " 


(मुंबई पुणे मुंबई चित्रपटातील संवादा वरील reflections. चित्रपटात एक चांगल असतं दिग्दर्शक शेवट गोड करत असतो, जीवन नात्यात हि गोडी आणता यावी/ येईल  म्हणून ) 
 
 
 

No comments:

Post a Comment