Thursday 7 September 2017

नद्यां वाचवा जागरूकता मोहीम :

 
भारतीय नगरं नदीच्या काठी वसली आहेत आणि आपली  संस्कृती नदीच्या किनारी समृद्ध होत गेली आहे. गंगा , यमुना , सिंधू ,सरस्वती , कावेरी गोदावरी नर्मदा अश्या असंख्य नद्यां आपल्या जीवनरेखा आहेत. नद्यांचं महत्व आपल्या जीवनात खूप मोठं आहे त्यांना आपण मैया , मा ,आई माता म्हणतो, मानतो, नद्या  आपली तीर्थक्षेत्रं आहेत. 

पुराणकाळा पासून अस्तित्वात असेलल्या नद्या , वाढती लोकसंख्या, उद्योगीकरण वृक्षतोड , सांडपाणी , जलउपसा , रेतीवाळू उपसा या मुळे मृतावस्था कडे वाटचाल करत आहेत.  वेळीच आपण सुधारलो नाहीतर.


 
छोट्या छोट्या नद्या लुप्त झाल्या आहेत. काही मोठ्या नद्या आठमाही बनल्या आहेत उन्हाळ्यात नद्यांची पात्रं कोरडी होतात. आपल्या देशातील ४०% पेक्षा जास्त लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावं लागतंय. 


ईशा  फाउंडेशन नी सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या मार्गदर्शना खाली " नद्यां वाचावा  जागरूकता मोहीम  सुरु केली आहे. ३ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी वरून सुरु झालेली यात्रा २ ऑक्टोबर २०१७ ला हिमालयाच्या पायथ्याशी पूर्ण होईल. 



आपल्या नद्या मृत होत आहेत , मोठाली पात्रं  कोरडी पडत आहेत आपण काही केलं नाही तर पंधरावर्षात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न  भीषणरूप धारण करील यांची जाणीव  भारतवर्षात   निर्माण व्हावी हे मुख्य उद्दिष्ट. जमिनीची पाणीधारण करण्याची क्षमता वाढावी म्हणून नदीच्या किनारी दोन्ही बाजूला एक किलोमीटर पर्यंत वृक्षलागवड करावी, सरकारी जमीन असेल तिथे वनखात्यांनी तर खाजगी जमीन असेल तेथे शेतक-यांनी फळांची झाडे लावावी.  राज्य आणि केंद्र सरकारनी नद्यांविषयी धोरण जाहीर करावं
 
या जागरूकतेच्या मोहिमेत प्रत्येकांनी   म्हणजे जो  पाण्याचा उपभोक्ता आहे त्या सर्वांनी  सहभागी व्हायला पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीची काळजी घ्यायला हवी. 

No comments:

Post a Comment