Monday 13 May 2019

तरुणांनी खूप वाचलं पाहिजे खूप ऐकलं पाहिजे.











तरुणांनी खूप वाचलं पाहिजे , खूप ऐकलं पाहिजे सार्वजनिक ठिकाणी जाऊन त्यात सहभागी झालं पाहिजे. मोबाईलची खिडकी म्हणजे सर्व काही नाही. तरुण रंगकर्मीनी काही दिवस  तरी नाटक करायला हवं. त्यातील अनुभव आयुष्यभर पुरेल. नाटक म्हणजे टीम वर्क आहे. ते सर्व टीमचं असतं. असे मार्गदर्शन सिने नाट्य दिग्दर्शक श्री चंद्रकांत कुलकर्णी यांनी वसई तील  संजीवनी व्याख्यानमालेत केलं. नाट्यक्षेत्रातील संशोधक दिग्दर्शक गिरीश पतके यांनी त्यांची मुलाखत घेतली.





 
यावेळी  ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले, युवा काष्ठशिल्पकार श्री सचिन चौधरीचा सत्कार   जेष्ठ रंगकर्मी, निर्माता श्री सुनील बर्वे व लोकप्रिय साहित्यिका वीणाताई गवाणकर ह्याच्य हस्ते करण्यात आला.


आपल्याकडे कीर्तन ,व्याख्यानमाला , श्रवणभक्तीची परंपरा आहे. जोपर्यंत कोणीतरी बोलत राहावे आणि कोणालातरी ऐकत राहावं असं वाटत राहील तो पर्यंत थिएटर जिवंत राहील असं ते पुढे म्हणाले.  





नाटक हे खूप प्रभावी माध्यम आहे. नाटकात पाहिलेली गोष्ट,ऐकलेली वाक्य कायमस्वरूपी   स्मरणात राहतात. नाटकाचं एक शास्र आणि मानसशास्र आहे. ठरवून अंधार करून घेतात व दृश्यमान चौकटीत स्वतः ला जोडून घेत अनुभूती घेत असतात.

















सुरवातीला हेमंत नाईक यांनी पाहुण्याची ओळख व प्रास्ताविक केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्कर्ष मंडळाचे श्री काशिनाथ नाईक होते.   कु. निधी नाईक हिने सूत्रसंचालन केलं तर सौ तेजल पाटील हिने ईशस्तवन सादर केलं. 







कार्यक्रमाला वीणाताई गवाणकर, शिल्पकार सचिन चौधरी श्री सुनील बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. 




No comments:

Post a Comment