Monday 13 May 2019

माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच आमचे मागणे


आई वडिलांचा आंतरजातीय विवाह मी एक वर्षाचा असताना त्यांची हत्या झाली. आजोबानी (आईच्या वडिलांनी )मला लोणावळ्याच्या बालग्राम मध्ये ठेवलं. आई , बाबा काय असतात हे माहित नाही. इतर मुलांना त्यांचे आईवडील शाळेत सोडायला यायचे तेव्हा आम्ही लपून त्यांच्या कडे पाहायचो आणि वाटायचं असं आम्ही  काय पाप केलं होतं की आम्हाला आई बापाचं प्रेम मिळू नये, असे मनोगत अनाथांचा नाथ , एकता निराधार संघाचा संस्थापक व अठरावर्षावरील अनाथ मुलांचं सामाजिक पुनर्वसन करणाऱ्या श्री सागर रेड्डी यांनी वसईतील संजीवनी व्याख्यानमालेत व्यक्त केले. प्रसिद्ध मुलाखतकार श्रीमती स्मिता गवणकर यांनी  त्यांची मुलाखत घेतली. 


वय वर्ष अठरा पर्यंत आंतरभारती बालग्राम मध्ये आसरा मिळाला. त्यानंतर एकदम रस्त्यावर ,समोर अनेक प्रश्न. रेल्वे स्टेशन वर राहिलो, केबल टाकण्याचं काम केलं. अनेक प्रयत्न नंतर एक दाता मिळाला त्यामुळे इंजिनिअर होऊ शकलो एल अँड टी मध्ये नोकरीला लागलो. दिवाळीच्या वेळी बालग्राम मध्ये भेटण्यासाठी गेलो तेव्हा अप्पू ताईची भेट झाली. ती  अप्पू ताई जिने मला लहानपणी आईची माया दिली होती. लग्नानंतर तिच्यावर दुर्दैव ओढवलं होतं, तिचा चेहरा झोपू देत नव्हता तिथून एकता निराधार संघाची सुरुवात झाली. आज  एकता निराधार संघ महाराष्ट्र ,कर्नाटक आंध्रप्रदेश येथे कार्यरत आहे. . संवादाच्या ओघात त्यांनी संस्थेची कार्यप्रणाली ,पुढील योजना सहभाग कसा देता येईल इत्यादी गोष्टी सांगितल्या.













यावेळी संजीवनी परिवार तर्फे एकता निराधार संघाला एकावन्न हजार रुपयाचा कृतज्ञता निधी अर्पण करण्यात आला. 
माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच आमचे मागणे 





































सुरवातीला नरेश जोशी यांनी पाहुण्याची ओळख करून दिली व व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी साह्य करणाऱ्या  वसई जनता सहकारी बँक , बेसिन कॅथॉलिक सहकारी बँक, भारत पेट्रोलियम , इंडियन ऑइल तसेच सर्व जाहिरातदार, हितचिंतक याचे आभार मानले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत म्हात्रे होते. 








व्याख्यानाला प्रसिद्ध साहित्यिका सौ वीणाताई गवाणकर , वसई जनता बँकेचे श्री महेश देसाई,श्री संतोष देशमुख    बस्सीनं कॅथॉलिक बँकेचे महाव्यवस्थापक श्री आग्नोलो पेम , साब्रा संघाचे अध्यक्ष श्री राजन नाईक , श्री बबनशेठ नाईक,यशवंत पाटील  उपस्थित होते. 








































कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी नाईक हिनं केलं तर ईशस्तवन सौ उर्मिला नाईक हिने सादर केलं. 

1 comment:

  1. छान शब्दांकन दादा. क्षणचित्रांमुळे पुनः एकदा आनंद घेता आला.

    ReplyDelete